उसाला उचल जाहीर केल्याशिवाय साखर कारखान्यांच गाळप होऊ देणार नाही
प्रतिक मिसाळ सातारा
सातारा:सातारा जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी 20-21हंगामातील गाळप होणाऱ्या उसाला प्रती टन FRP 2850 रु . उचल जाहीर केल्याशिवाय एकही साखर कारखान्याचा गाळप सुरू होऊ देणार नाही असा इशारा सातारा कार्यकारिणीमध्ये सातारा जिल्ह्यातील शेतकरी संघटना किसान मंचचे कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्री शंकरअण्णा गोडसे यांनी दिला आहे . जिल्ह्यातील 16 साखर कारखान्यांपैकी ज्यांनी FRP दिली नाही त्या साखर कारखान्यांना गाळप लायसन्स साखर आयुक्तांनी कसे दिले याचबरोबर जिल्ह्यातील साखर कारखाने काटामारी करतात याची जिवंत उदाहरणे समोर आली आहेत असे सगळे प्रकार चालू असताना वजन मापे निरीक्षक नक्की काय करतायेत वजन मापे निरीक्षकांनी 48 तासाच्या आत सर्व साखर कारखान्यांचे वजन काटे चेक नाहीत तर गाठ आमच्याशी आहे असा इशारा शेतकरी संघटना किसान मंच चे कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य शंकर अण्णा गोडसे यांनी दिला आहे .
जर का खाजगी वजनकाटे यांनी प्रामाणिकपणे वजन काट्याचा सदोष वजन पावती शेतकऱ्यांना दिली नाही तर त्या वजन काट्याच्या नुकसानीस ( तोडफोड ) यास जबाबदार वजन काटा मालक राहील ऊस तोडणी कामगारांना व वाहतुकधार यांना आमची विनंती राहील 2850 रु . FRP ची एकरकमी देणाऱ्या साखर कारखान्यांना आमचे सहकार्य राहील . शुगरकेन कंट्रोल 1966 नुसार 14 दिवसात FRP न देणाऱ्या कारखान्याच्या विरोधामध्ये व मागील वर्षात 2019-2020 मध्ये ज्यांनी FRP दिली नाही त्या कारखान्याचे चेअरमन / मॅनेजिंग डायरेक्टर त्यांची गैय शेतकरी संघटना करणार नाही , यांच्या साखर कारखान्याच्या ऊसतोड व ऊसवाहतुक करणाऱ्या वाहनधारक व ऊसतोडी टोळ्या यांचे नुकसान झाल्यास व कायदा सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य साखर आयुक्त , जिल्हा प्रशासन आणि साखर कारखानदार राहतील असा इशारा शेतकरी संघटना किसान मंचचे कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य शंकरअण्णा गोडसे यांनी सातारा जिल्हा कार्यकारिणीच्या मीटिंगमध्ये कराड येथे साईदीप कंन्ट्रक्शन कोल्हापूर नाका या ठिकाणी झाला.