रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान धावले आपत्तीग्रस्त कुटुंबांच्या मदतीला. - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Saturday, October 17, 2020

रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान धावले आपत्तीग्रस्त कुटुंबांच्या मदतीला.

 रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान धावले आपत्तीग्रस्त कुटुंबांच्या मदतीला.

                 राम जळकोटे-तुळजापूर

तुळजापूर तालुक्यातील किलज येथे मुसळधार पाऊस पडून गावातील शेती सह घरांमध्ये पाणी शिरले होते , यामध्ये नदिलगत घरे असलेल्या कुटुंबाच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, यात या कुटूंबाना त्यांच्या या कठीण काळात आधार म्हणून रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या सेवाभावी संस्थेच्या वतीने या कुटुंबाना किराणा साहित्य किट चे वाटप करण्यात आले.प्रतिष्ठानच्या अध्यक्षा. अभिनेत्री. अश्विनीताई महांगडे आणि उपाध्यक्ष. निलेश जगदाळे यांच्या माध्यमातून प्रतिष्ठान चे तुळजापूर तालुका सदस्य प्रसाद राजमाने, राम जळकोटे, अविष्कार फस्के, शुभम नलावडे यांनी या कुटुंबाना मदत केली .त्याचबरोबर या सेवाभावी संस्थेच्या ऑफीसिअल पेज वरून या सदस्यांच्या माध्यमातून सद्य परिस्थिती दाखवण्यात आली. या मदतीचे आपत्तीग्रस्त कुटुंबाने आभार मानले.No comments:

Post a Comment