माजी कॅबिनेट मंत्री.मधुकरराव चव्हाण यांनी दिली किलज गावाला भेट ; हॅलो मेडिकल फाऊंडेशन संस्थेच्या वतीने करण्यात आले किटचे वाटप. - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Saturday, October 17, 2020

माजी कॅबिनेट मंत्री.मधुकरराव चव्हाण यांनी दिली किलज गावाला भेट ; हॅलो मेडिकल फाऊंडेशन संस्थेच्या वतीने करण्यात आले किटचे वाटप.

 माजी कॅबिनेट मंत्री.मधुकरराव चव्हाण यांनी दिली किलज गावाला भेट ; हॅलो मेडिकल फाऊंडेशन संस्थेच्या वतीने करण्यात आले किटचे वाटप.

राम जळकोटे-उस्मानाबाद

तुळजापूर तालुक्यातील किलज गावात मुसळधार पावसामुळे गावातील शेतीसह घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यामध्ये या मुसळधार पावसामुळे गावातील अनेक लोकांचे घरामध्ये पाणी शिरले होते तर गावात गावातील नदिलगत घरे असणाऱ्या लोकांची घरे ही पाण्याच्या अखंडित प्रवाहाबरोबर वाहून गेली आहेत. यामध्ये कसलीही जीवितहानी झालेली नाही. या कुटुंबाना या कठीण काळात आधार म्हणून माजी. मंत्री.तथा तुळजापूर तालुक्याचे माजी.आमदार. मधुकरराव चव्हाण आणि हॅलो मेडिकल फाऊंडेशनचे बसवराज नरे यांनी भेट दिली. घटनास्थळी सर्व गोष्टींची पाहणी केली. माजी. मंत्री. मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते या कुटूंबाना घराचे पुनर्वसन करण्यासाठी घरावरील पत्रे देण्यात आले तर हॅलो मेडिकल फाऊंडेशनचे अध्यक्ष. डॉ. शशिकांत अहंकारी यांच्या माध्यमातून संस्थेचे बसवराज नरे आणि प्रबोध कांबळे यांच्या हस्ते किराणा किटचे वाटप करण्यात आले.

या कठीण काळात केलेल्या मदतीबद्दल या कुटुंबाने यांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment