Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

म्हसळा तालुक्यातील आरोग्य ,रस्ते नगरपंचायत स्वच्छता या मूलभूत प्रश्नांसाठी खासदार सुनिल तटकरे, पालकमंत्री तटकरे व आमदार तटकरे यांना साकडे.

 म्हसळा तालुक्यातील आरोग्य ,रस्ते नगरपंचायत स्वच्छता या मूलभूत प्रश्नांसाठी खासदार सुनिल तटकरे, पालकमंत्री तटकरे व आमदार तटकरे यांना साकडे.

सर्वच प्रश्न मार्गी लागणार 

अरुण जंगम-
महाराष्ट्र मिरर टीम म्हसळा


म्हसळा तालुक्यातील आरोग्य,रस्ते ,नगरपंचायत स्वच्छता अशा अनेक म्हसाळा करांच्या मूलभूत व आवश्यक आशा सोयी सुविधांसाठी म्हसळा तालुका प्रेस क्लबच्या माध्यमातून खासदार सुनील तटकरे यांची आज सुतार वाडी येथे विशेष भेट घेऊन निवेदन देण्यात आले यावेळी अध्यक्ष शशीकांत उर्फ बाबू शिर्के,ज्येष्ठ पत्रकार संजय खांबेटे,अशोक काते उदय कळस,महेश पवार,अंकुश गाणेकर,हेमंत पयेर,श्रीकांत बिरवाडकर,अरुण जंगम ही पत्रकार मंडळी उपस्थित होती

यावेळीप्रामुख्याने ग्रामीण रुग्णालय म्हसळा सुरु होऊन तब्बल दहा वर्षे झाली तरी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक व अन्य 50% पदे रिक्त असणे,आवश्यक यंत्रसामग्री नसणे, ग्रामिण रुग्णालय इमारतीत प्रा.आ.केंद्र म्हसळा यांचे अस्तीत्व असणे याबाबत लवकरच पूर्णता व्हावी हा विषय पत्रकारांनी खासदार तटकरेंकडे लावून धरला, याच वेळी जिल्हा परिषदेचे आरोग्य यंत्रणेबाबत तक्रारीचा सूर लावताना तालुका आरोग्य अधिकारी गणेश कांबळे यांचे कोव्हीड १९ सारख्या परिस्थीतीत लोकप्रतिनिधी अधिकारी व स्थानिक मंडळींचे जवळ योग्य समन्वय नसतो अनेक वेळा महत्त्वाच्या बैठकीत ते सातत्याने अनुपस्थित असतात याबाबत तक्रार करण्यात आली तालुका आरोग्य अधिकारी यांनी भविष्यात सकारात्मक संवाद व समन्वय साधून तालुका आरोग्य व्यवस् स्थेत पारदर्शकता आणावी अशी मागणी पत्रकारांनी केली तालुक्यात आय.टी.आय आगरवाडा येथे शासकीय कोविंड केअर सेंटर चे सुरुवात करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी नगरपंचायत प्रशासनाचे आखत्यारीतील शहरातील गटारे, कचरा व्यवस्थापन व डंपींगस्टेशन,शासकीय स्वच्छता गृहे याकडे प्रकर्षाने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली. तालुक्यातील वीज ग्राहकांना आलेली वाढीव विज बिलही अवाच्यासवा आलेली आहेत त्यात योग्य दुरुस्ती होणे अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले.याच वेळी पुणे दिघे या राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम अनेक ठिकाणी असणारे खड्डे त्यामुळे होणारा त्रास याकडे खासदार महोदयांचे लक्ष वेधण्यात आले त्याचबरोबर म्हसळा न्यू इंग्लिश स्कूल ते तोंडसुरे बायपास या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली यावेळी खासदार तटकरे यांनी राज्यमंत्री मंडळातील संबंधित मंत्री महोदयाजवळ तात्काळ संपर्क साधून पालक मंत्री सोबत मीटिंग घेऊन झूम द्वारे तालुक्यातील पत्रकारांना कनेक्ट करुन तात्काळ समस्या सोडविता येतील असे सकारात्मक आश्वासन दिले.

यावेळी म्हसळा प्रेस क्लबने पालक मंत्री आदीतीताई तटकरे , आमदार अनिकेत तटकरे यांची सदािच्छा भेट घेतली.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies