Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

महाराष्ट्र मिररच्या दणक्याने पीएमपीएमएल बस प्रशासन झाले जागे ती बंद पडलेली बस अखेर आज हलवली

          महाराष्ट्र मिररच्या दणक्याने

 पीएमपीएमएल बस प्रशासन झाले जागे

ती बंद पडलेली बस अखेर आज हलवली 

मिलिंद लोहार-पुणेकालच महाराष्ट्र मिररनी ठोस भूमिका मांडत pmpml बस रामभरोसे कधी कोठे बंद पडेल सांगता येत नाही या संबंधीचे वृत्त प्रसारित केलं होतं.फातिमा नगर येथील बस गेल्या सहा दिवसापासून मेन रोडवर उभी आहे तिला कोण वाली आहे का नाही बंद हे वृत्त प्रसारीत झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि आज सातव्या दिवशी अखेर पीएमपीएमएलला मुहूर्त सापडला असून ही बस इथून हटवण्यात आली आहे.

रोज नागरिकांना ऑफिसला जाताना याचा नाहक त्रास होत होता.

तरी येथील काही लोक बोलत होते हे नेहमीच आहे काय नवीन नाही म्हटले तर pmpml ला सोनेरी दिवस हवे असतील तर आपल्या बसेस व्यवस्थित स्वछ व सुंदर ठेवा तरच लोक व्यवस्थित निगा राखतील आणि बंद पडल्यावर लगेच एक तासात व्यवस्था उपलब्ध होईल अशी सोय करा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies