सोलापूर जिल्ह्यातील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमार्फत थेट कर्जपुरवठा - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Thursday, October 1, 2020

सोलापूर जिल्ह्यातील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमार्फत थेट कर्जपुरवठा

 

सोलापूर जिल्ह्यातील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमार्फत थेट कर्जपुरवठा 


मिलिंद लोहार -पुणे




महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे सोलापूर जिल्ह्यातील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमार्फत थेट कर्जपुरवठा करणेबाबत व राज्यातील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थांचे संगणकीकरण करणेबाबत इत्यादी विषयाबाबत बैठक संपन्न झाली.सदर बैठकीस अनिल कवडे सहकार आयुक्त, .शेखर गायकवाड, साखर आयुक्त, एल.एल.रावल मुख्य व्यवस्थापक नाबार्ड पुणे, शैलेश कोतमीरे प्रशासक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोलापूर,  डॉ.पी.एल.खंडागळे अप्पर आयुक्त, विद्याधर अनास्कर प्रशासक राज्य सहकारी बँक व प्रदीप बर्गे उपनिबंधक(कृषीपत) उपस्थित होते.



सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आर्थिक अडचणीत असल्यामुळे मागील ६ ते ७ वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नव्याने अल्प मुदतीचे कर्ज वाटप करणे पूर्णतः बंद आहे. मागील दोन वर्षात बँकेच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्ज वाटप व्हावे यासाठी माननीय सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सहकार आयुक्त आग्रही होते. याबाबत माननीय मंत्री महोदयांनी मा. सहकार आयुक्त, नाबार्ड, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, प्रशासक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोलापूर यांच्या उपस्थितीत वेळोवेळी सभा घेऊन पाठपुरावा केला होता. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोलापूर यांनी दिनांक १ ऑक्टोबर २०२० पासून नव्याने अल्पमुदत कर्ज वाटपासाठी चा निर्णय घेतलेला असून एक लाखापर्यंत कर्ज वाटप सुरू केले आहे.


माननीय मंत्री महोदयांनी सोलापूर जिल्ह्यातील बँक धोरणानुसार नव्याने कर्ज वाटपासाठी पात्र असणाऱ्या ३३४ विकास सेवा संस्थांच्या शेतकरी सभासदांना कर्ज वाटप करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने कमी व्याज दराने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला कर्जपुरवठा करण्याबाबतच्या सूचना दिल्या. तसेच सांगड पद्धतीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वसुली देणेबाबत साखर आयुक्तांनी संबंधित साखर कारखान्यांना सूचना देण्यात यावी असे निर्देश दिले.


राज्यातील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थांचे संगणकीकरण करणे बाबत नाबार्ड महाराष्ट्र राज्य सहकारी बँक जिल्हा सहकारी संस्थांनी पुढाकार घेऊन प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील एका जिल्ह्यात सुरवात करावी त्याचा पाठपुरावा माननीय सहकार आयुक्तांनी करावा अशा सूचना देण्यात आल्या.

No comments:

Post a Comment