उंब्रज येथील शिवसैनिकांनी केला मंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिर्घआयुष्यासाठी लघुरुद्र अभिषेक - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, October 11, 2020

उंब्रज येथील शिवसैनिकांनी केला मंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिर्घआयुष्यासाठी लघुरुद्र अभिषेक

 उंब्रज येथील शिवसैनिकांनी केला मंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिर्घआयुष्यासाठी लघुरुद्र अभिषेककुलदीप मोहिते -कराडजेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर संकट येते तेव्हा महाराष्ट्राचे बांधकाम व  नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे संकटमोचक म्हणून धावून येतात मग ते सांगली कोल्हापूर मधील महापूर बचाव व मदत कार्य रायगड मधील चक्रीवादळ असो वा कोरोना महामारी काळामध्ये बाधित लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप व त्यांना वैद्यकीय सेवा पुरवणे जीवाची बाजी लावून ते लोकांमध्ये जाऊन लोकांना मदत करत असतात यातच त्यांना  कोरोना ची लागण झाली त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिक त्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना करू लागले

यातच उंब्रज येथील एकनाथ शिंदे यांचे सहकारी व  उंब्रज शिवसेना विभाग प्रमुख संतोष बेडके व त्यांच्या सहकारी शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी   एकनाथ शिंदे यांच्या कोरोना विरुद्धच्या लढ्याला बळ मिळावे व त्यांची तब्येत लवकरात लवकर सुधारावी व त्यांना दीर्घ आयुष्य लाभावे  यासाठी उंब्रज येथे कृष्णा नदीकाठी असलेल्या  जागृत शिवमंदिराच्या  शिवलिंगा समोर  शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे व सोशल डिस्टंसिंग चे पालन करून लघुरुद्र अभिषेक केला यावेळी शिवसेना उपविभाग प्रमुख सचिन जाधव कळंत्रेवाडीचे शाखाप्रमुख रघुनाथ थोरात सुधाकर थोरात रवींद्र वाकडे बापूराव घाडगे सुहास देशमाने हर्षल बेडके उपस्थित होते संतोष बेडके व त्यांच्या सहकाऱ्यांनी  लघुरुद्र अभिषेक करून आपल्या ठायी नेत्या प्रती असलेला प्रेमभाव दाखवला आहे कोरोना महामारीच्या काळामध्ये संतोष बेडके व त्यांच्या सहकारी शिवसैनिकांनी उंब्रज  विभागामधील गावोगावी जाऊन केलेले काम मग ते आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप असो वा कोरोना  विषयी जनजागृती निश्चितच  प्रेरणादायी आहे नुकतीच मंत्री एकनाथजी शिंदे यांनी कोरोनावरवर  मात केली आहे व परत त्याच सेवाभावी वृत्तीने पुन्हा जनतेच्या सेवेसाठी रूजू झाले आहेत

No comments:

Post a Comment