काळज जि.सातारा येथील लहानग्याचा खूनाचा पोलीसांनी लावला छडा...! नराधम जेरबंद ... - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Saturday, October 3, 2020

काळज जि.सातारा येथील लहानग्याचा खूनाचा पोलीसांनी लावला छडा...! नराधम जेरबंद ...

 काळज जि.सातारा येथील लहानग्याचा खूनाचा पोलीसांनी लावला छडा...! नराधम जेरबंद ...कुलदीप मोहिते -सातारासातारा जिल्ह्यामधील फलटण तालुक्यातील काळज येथील दहा वर्षीय मुलाचे अपहरण करून खून करण्यात आला होता या घटनेने संपूर्ण सातारा जिल्हाच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राला हादरून सोडले पण सातारा  जिल्हा प्रमुख पोलिस अधीक्षक तेजस्विनी सातपुते  व त्यांच्या टीमने केलेल्या तडफदार कामगिरीमुळे अवघ्या 48 तासात 28 वर्षीय संशयित आरोपीस अटक करण्यात सातारा पोलिसांना यश आले आहे  संबंधित आरोपीचे मुलाच्या आईवर एकतर्फी प्रेम होते  मुलाच्या आईकडून कोणताही प्रतिसाद देत नव्हती त्याचा राग मनात धरून संशयित आरोपीने सुड उगवण्याच्या भावनेतून लहान बाळाचे अपहरण करून खून केला संशयित आरोपी हा स्थानिक स्थानिक आहे बाळाच्या घरातील मुलींनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी संशयिताला पकडले होते त्याची चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली पण नंतर पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपण एक तर्फी प्रेमातून खून केल्याचे कबूल केले अशी माहिती सातारा पोलिसांनी दिली आरोपीला कठोरात कठोर शिक्षा कशी होईल याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत असे सातारा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते  यांनी सांगितले

No comments:

Post a Comment