"माझे कुटुंब माझी जबाबदारी "अभियाना अंतर्गत राज्याचे गृहराज्यमंत्री पोहचले पाटण मतदार संघातील गावोगावी....... - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Saturday, October 3, 2020

"माझे कुटुंब माझी जबाबदारी "अभियाना अंतर्गत राज्याचे गृहराज्यमंत्री पोहचले पाटण मतदार संघातील गावोगावी.......

 "माझे कुटुंब माझी जबाबदारी "अभियाना अंतर्गत राज्याचे गृहराज्यमंत्री पोहचले पाटण मतदार संघातील गावोगावी.......                  

                   हेमंत पाटील -पाटण                 

माझे कुटुंब माझी जबाबदारी” अभियानातंर्गत राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई पोहचले पाटण  मतदारसंघातील गावोंगावी. प्रमुख गांवामध्ये जाऊन सामाजिक अंतर पाळत स्पीकरवरुन केली या अभियानाची जनजागृती.

   


 

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी “माझे कुटूंब माझी जबाबदारी” ही संकल्पना राज्यातील जनतेच्या समोर ठेवली आहे.मुख्यमंत्री यांच्या या संकल्पनेची जनजागृती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी त्यांचे मतदारसंघातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांना बरोबर घेत प्रत्यक्षात मतदारसंघातील ग्रामीण भागातील अनेक गांवागांवात जाऊन केली.


सामाजिक अंतर पाळत स्पीकरवरुन त्यांनी ग्रामीण भागातील नागरिक,महिला व युवक-युवतींना या अभियानाचे महत्व पटवून दिले. कोरोना संसर्गापासून आपणच आपला बचाव केला पाहिजे याकरीता हे अभियान खुप महत्वपुर्ण आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील कुटुंबांतील प्रत्येकाने सतत मास्क वापरा,बाहेरुन घरात आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवा, घरातून बाहेर गेल्यानंतर सामाजिक अंतर पाळा या महत्वाच्या बाबींचे आवाहन ना.शंभूराज देसाईंनी गावागांवात जावून केले असून कोरोनाच्या महामारीत राज्याचे मुख्यमंत्री व त्यांच्या मार्गदर्शनाखालील संपुर्ण राज्य शासन राज्यातील जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचेही शंभूराज देसाईंनी सांगितले.



 

No comments:

Post a Comment