काळप्रकल्पचा भांदरे नदीवरील पुल कोसळला, काळप्रकल्प अधिकारींचे दुर्लक्ष - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Wednesday, October 7, 2020

काळप्रकल्पचा भांदरे नदीवरील पुल कोसळला, काळप्रकल्प अधिकारींचे दुर्लक्ष

 काळप्रकल्पचा भांदरे नदीवरील पुल कोसळला, काळप्रकल्प अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष,शिवसेना धरणं आंदोलन करणार


अमोल चांदोरकर - श्रीवर्धन


गेली काही वर्षापासून कोकण पाटबंधारे मार्फत काळ प्रकल्पाकडे दुर्लक्ष होत आहे.अनेक ठिकाणी पूल कोसळले आहेत.साकव ना दुरुस्त झाले असून कालव्यांची पण फार मोठ्या प्रमाणात नादुरुस्ती झालेली आहे.अशा या परिस्थिती मध्ये भांदरे चौकी जवळील व नदीवरील पूल  ६/८/२०२० रोजी कोसळला असल्याने मळेगाव आदिवासीवाडी, हातकेळी, मुगवली, कविळवहाळ व भांदरे या गावांचा संपर्क तुटल्याने ग्रामस्थांना जाणे येणे करीता फार मोठे अंतर कापावे लागते व शेतीवर जाण्याचा मार्गच बंद झाला आहे.पूल तुटल्याची माहिती सरपंचाने सर्व संबंधित विभागांना दिली असून जवळ जवळ दोन महिने होत आले तरी काळ प्रकल्पाचे कोणीच अधिकारी घटनास्थळी आलेले नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.अतिवृष्टी झाली त्यामुळे पूल कोसळला व पाण्याच्या योजनेचे पाईप व लाईन होती त्या पाण्याच्या योजनेचे सुध्दा फार मोठे नुकसान झाले आहे.कार्यकारी अभियंता काळ प्रकल्प यांनी तातडीने नवीन पुलाची शासना कडून मंजुरी घ्यावी  व ग्रामस्थांची अडचण दूर करावी त्यासाठी आमदार भरतशेट गोगावले, राजिप सदस्य अमृता हरवंडकर, सरपंच, ग्रामस्थ यांचे लेखी पत्र देखील दिले असल्याची माहिती प्रमोद घोसाळकर यांनी केली असून पूल प्रश्नावर लवकरात लवकर कार्यवाही करण्याची  मागणी केली आहे शिवसेनेचे मा. जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी लेखी पत्राद्वारे केली असून सद्यस्थितीत स्थानिक नागरिकांना, शेतकरी बांधवांना, विद्यार्थी वर्गाला याचा त्रास होत असून काळप्रकल्प अधिकारी यांच्या ढिसाळ कारभारावर शेतकरी वर्गानी नाराजी व्यक्त करत लवकरात लवकर पुलाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आवाहन केले आहे.


भांदरे पुल कोसळून ४ महिने उलटले तरीदेखिल संबंधित अधिकारी वर्गानी पाहणी देखील केली नाही. लवकरात लवकर कार्यवाहि न केल्यास ग्रामस्थांकडून धरणे आंदोलन उभारू- 

शिवसेना माजी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर.

No comments:

Post a Comment