माजी आमदार सुरेश लाड यांनी भातपिकाच्या नुकसानीचे पंचनामे लवकर व्हावे व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी कर्जत तहसिलदार यांचेकडे दिले निवेदन. - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 20, 2020

माजी आमदार सुरेश लाड यांनी भातपिकाच्या नुकसानीचे पंचनामे लवकर व्हावे व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी कर्जत तहसिलदार यांचेकडे दिले निवेदन.

माजी आमदार सुरेश लाड यांनी भातपिकाच्या नुकसानीचे पंचनामे लवकर व्हावे व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी कर्जत तहसिलदार यांना दिले निवेदन.


नरेश कोळंबे-कर्जत     कर्जत तालुक्यात 15 ऑक्टोबर पासून पडलेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे , त्याचे पंचनामे लवकरात लवकर करण्यात यावे व शेतकऱ्यांना लवकर मदत देण्यात यावी, यासाठी तहसीलदार कर्जत विक्रम देशमुख यांच्याकडे निवेदन दिले 

       महाराष्ट्रातील अनेक जिल्हे व गावे परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीच्या भरपाईसाठी त्रस्त आहेत व सर्व शेतकऱ्यांनी यासाठी राज्यसरकार कडे ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली आहे . याच धर्तीवर, कर्जत खालापूरचे माजी आमदार सुरेश लाड यांनी आज कर्जत तहसील येथे जाऊन कर्जत तहसीलदार विक्रम देशमुख यांची भेट घेत सदर निवेदन सादर केले. निवेदनाद्वारे त्यांनी सरकारने 15 ऑक्टोबर पासून झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास लोकांची पिके पडल्या मुळे गेला असल्याचे सांगितले, म्हणून तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन सर्व शेतकऱ्यांना  पंचनामे करून मदत पोचवावी, अशी मागणी करणारे निवेदन यावेळी निवेदन नायब तहसिलदार चव्हाण यांच्याकडे सोपविले. तहसीलदार विक्रम देशमुख आल्यानंतर त्यांच्यासोबत मागील शेत नुकसानीचे पंचनामे व त्याचे आकडे मागून त्याची चौकशी यावेळी सुरेश लाड यांनी केली.

     यावेळी कर्जत मधील विविध कार्यकर्ते उपस्थित होते त्यामध्ये अशोक भोपतराव तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, तानाजी चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा चिटणीस , सागर शेळके युवा राष्ट्रवादी काँग्रेस, शाहनवाज पानसरे, विलास खाडे, जाहीर खान, ऋषिकेश भगत, संतोष थोरवे, सोमनाथ पालकर, प्रतीक्षा लाड, प्रशांत खाडे,  अॅडवोकेट निरगुडकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 
सर्व कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान केले आहे. त्यांच्या पडलेल्या भातपिकाचे पंचनामे लवकर करण्यात यावे, व सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांना दिलासा रक्कम तथा भरपाई द्यावी , मागील 3 जुन रोजी झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते पण भरपाई खूप कमी आल्याची खंत वाटते. 
            --सुरेश लाड ( माजी आमदार कर्जत खालापूर)

No comments:

Post a Comment