Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

महाबळेश्वर व पाचगणी येथे घोडेस्वारी व नौका विहारासाठी सशर्त परवानगी

 

महाबळेश्वर व पाचगणी येथे घोडेस्वारी व नौका विहारासाठी सशर्त परवानगी

प्रतिक मिसाळ -महाबळेश्वरसातारा जिल्ह्यामध्ये कोविड -19 चा प्रादुर्भाव वाढत असून वाढत्या कोविड -19 रुग्णांचे संक्रमण रोखण्याच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत . राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार वेळोवेळी आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत . त्यास अधिन राहुन शेखर सिंह , अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी सातारा यांनी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व पाचगणी येथील " घोडेस्वारी " तसेच महाबळेश्वर येथील " वेण्णा लेक बोट क्लब येथे नौका विहार " पर्यटनाच्या बाबीसाठी खुले करण्यास तसेच व्यवसाय सुरु करण्यास खालील सूचना व मार्गदर्शक सूनचेस अधिन राहुन मान्यता देत आहे . घोडेस्वारी नगरपालिकेने घोडेस्वारांना 1 दिवसाआड 50 टक्के घोडस्वारांचे नियोजन करुन देणे बंधनकार राहिल . 
दररोज प्रत्येक पर्यटकांची नोंद नोंदवहीत ठेवणे घोडेस्वारांवर बंधनकारक राहिल . जी पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी खुली नाहीत अशा ठिकाणी घोडेस्वारी करण्यास मनाई राहील . घोडेस्वारीसाठी वारपण्यात येणाऱ्या घोड्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र असणे बंधनकारक राहील व्यवसाय सुरु करण्यापूर्वी घोडे चालक अथवा मालक यांची कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे . घोडेस्वारीसाठी नागरपरिषद परवाना व बॅचक्रमांकं असणे आवश्यक आहे . देण्यात येणरा बॅचक्रमांक दर्शनी भागामध्ये लावणे बंधनकारआहे . संघटनेमार्फत घोड्यांना क्रमांक देण्यात व दिलेल्या क्रमांकानुसाराच ( Queue System ) घोडेस्वारी करणे बंधनकारक आहे . कोणत्या ही प्रकारची गर्दी होणर नाही याची खबरदारी घेण्यात यावी . ज्या पर्यटकांचे तापमान 38.0 किंवा 100.4 पेक्षा जास्त आहे व ऑक्सिजन पातळी 95 पेक्षा कमी असल्यास अशा पर्यटकांना घोडेस्वारी करण्यापासून प्रतिबंध करण्यात यावा तापमान जास्त अथवा ऑक्सिजन पातळी कमी असल्यास संबंधित व्यक्तीस रुग्णालयामध्ये संदर्भित करावे . ज्या पर्यटकांना कोविड -19 सदृश्य लक्षणे उदा . सर्दी , खोकला इ . लक्षणे असल्यास घोडेस्वारीसाठी प्रतिबंध करण्यात यावा व दवाखान्यामध्ये संदर्भित करावे संघटनेने येणाऱ्या पर्यटकांचे नांव , पत्ता , वय , Co morbidity , तापमान , Sp02 व मागील 14 दिवसांच्या प्रवासाची माहितीची नोंद रजिस्टरमध्ये करण्यात यावी घोडे चालक व मालक यांची प्रत्येक 15 दिवसांनी कोविड चाचणी करणे बंधनकारक आहे व चाचणी केलेबाबतचा अहवाल नगरपरिषद कार्यालयामध्ये सादर करणे बंधनकारक आहे . तसे न केल्यास कोणतीही पूर्व सूचना न देता परवाना रद्द करण्यात येईल घोडेस्वारी करतांना घोडेव्यावसायिक यांनी मास्क , ग्लोब्ज , फेस शिल्ड सॅनिटायझर व सुरक्षा साधनांचा वापर करावा पर्यटकांना देखील मास्क ग्लोब्ज , फेस शिल्ड , सॅनिटायझर व सुरक्षा साधने वापरणे बंधनकारक आहे . घोडेस्वारीच्या दरम्यान मानवी संपर्क होत असलेल्या वस्तू निर्जंतूक करण्यात याव्या ज्या ठिकाणी घोडे स्वारीसाठी परवानगी देण्यात आलेली आहे त्याच ठिकाणी घोडेस्वारी करण्यात यावी अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल . रस्त्यावर घोडेस्वारीच्या ठिकाणी अथवा सार्वजनिक ठिकाणी घोड्यांची विष्टा पसरणार नाही याची दक्षता घेण्यात यावी . वेळोवेळी शासनमार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्यात यावे . वेण्णा लेक बोट कल्ब येथे नौका विहार : नगरपालिकेने दर दिवाशी एका बोटीच्या फक्त दोन फेऱ्या होतील एवढ्याच फेऱ्यांचे नियोजन करावे बोटिंग क्लबच्या ठिकाणी सामाजिक अंतर पाळणे , बोटी सॅनिटाईज करणे पर्यटकांना सुरक्षिततेच्या सुचना देणे मास्क व सॅनिझाटयझरचा वापर इ . सर्व नियोजन करण्याची जबाबदारी नगरपालिकेची राहील . बोटिंगसाठी येणाऱ्या पर्यटकांना सामाजिक अंतर राखणेबाबत सूचित करण्यात यावे व रांग पध्दतीचा अवलंब करण्यात यावा बुकिंग ऑफिसच्या ठिकाणी सामाजिक अंत राखण्यासाठी 1 मीटर अंतरावर खुणा करुन घेणे . ऑनलाईन बुकिंग करीता प्राधान्य  देण्यात यावे . बुकिंग ऑफिस येथे पर्यटकांना ई - पेमेंट सुविधा देण्यात यावी बोटिंगसाठी येणाऱ्या पर्यटकांचे प्रवेशद्वाराजवळ सामाजिक अंतर राखून तपासणी करण्यात यावी यामध्ये पर्यटकांचे तापमान , ऑक्सिजन पातळी तपासणी करण्यात यावी बोटिंगसाठी यणाऱ्या पर्यटकांचे नाव , पत्ता वय , Co morbidity , तापमान , Sp02 व मागील 14 दिवसांच्या प्रवासाची माहितीची नोंद रजिस्टरमध्ये करण्यात यावी ज्या पर्यटकांचे तापमान 38.0 किंवा 100.4 पेक्षा जास्त आहे व ऑक्सिजन पातळी 95 पेक्षा कमी असल्यास अशा पर्यटकांना घोडेस्वारी करण्यापासून प्रतिबंध करण्यात यावा तापमान जास्त अथवा ऑक्सिजन पातळी कमी असल्यास संबंधित व्यक्तीस रुग्णालयामध्ये संदर्भित करावे ज्या पर्यटकांना कोविड -19 सदृश्य लक्षणे उदा . सर्दी , खोकला इ . लक्षणे असल्यास घोडेस्वारीसाठी प्रतिबंध करण्यात यावा व दवाखान्यामध्ये संदर्भित करावे.  तिकीट विक्रीच्या ठिकाणी असलेल्या कर्मचारी यांनी मास्क , ग्लोब्ज फेस शिल्ड , सॅनिटायझर व सुरक्षा साधनांचा वापर करणे बंधनकारक आहे . बोटमन यांनी मास्क , फेस शिल्ड , ग्लोब्ज , सॅनिटायझर व सुरक्षा साधनांचा वापर करणे बंधनकारक आहे . पर्यटक यांनी मास्क , फेस शिल्ड , ग्लोब्ज , सॅनिटायझर व सुरक्षा साधनांचा वापर करणे बंधनकारक आहे . तिकीट मिळाल्यानंतर सामाजिक अंतर पाळून बोट पर्यटकांना देण्यात यावी जेट्टीवर गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी . एका बोटीमध्ये एकाच कुटुंबातील व्यक्तींना प्रवेश देण्यात यावा एका बोटीमध्ये जास्तीत जास्त 6 पर्यटक व 1 चालक यापेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेश देण्यात येऊ नये नौका विहाराच्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी सहली अथवा मोठया समूहांना ( ग्रुप ) बोटिंगसाठी परवानगी देण्यात येऊ नये प्रत्येक फेरीच्या वेळी बोट निर्जंतुक करणे बंधनकारक आहे . वेळोवेळी शासनमार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्यात यावे . या आदेशातील अटी व शर्तीचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथरोग A :नियंत्रण कायदा 1897 अन्वये कठोर कारवाई करण्यात येईल .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies