Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

'की दिल अभी भरा नहीं।',डॉ.भारतकुमार राऊत यांचा लेख

' की दिल अभी भरा नहीं.।'

डॉ.भारतकुमार राऊत

(लेखक हे राज्यसभेचे माजी सदस्य आणि महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक आहेत)

'...की दिल अभी भरा नहीं.।'
ठंडी हवाएं लहराते आयें
ऋतु है जवाँ, तुम हो यहाँ
कैसे बुलाएँ ...।

'नौजवान' या चित्रपटासाठी १९५१ मध्ये लुधियानातून आलेल्या अब्दुल गयी साहिर या तरुण कवीने संगीतकार एस. डी. बर्मन यांना गीत लिहून दिले व त्यांच्यासोबत साहिर यांची हिंदी चित्रपटसृष्टीतील वाटचाल सुरू झाली. 

हे गीत प्रचंड लोकप्रिय ठरले. साहिर यांनी या प्रेमगीतात संपूर्ण निसर्ग उभा केला होता. या गीताने चित्रपटसृष्टीला साहिर यांच्या प्रतिभेची चुणूक दाखवून दिली. त्यानंतर त्यांनी मागं वळून पाहिले 


गुरुदत्त यांनी प्रथमच दिग्दर्शित केलेल्या 'बाजी' चित्रपटासाठी साहिर यांनी लिहिलेले 'तदबीर से बिगडी हुई तकदीर बना ले...' या गीताने लोकप्रियतेचे उच्चांक गाठले. अभिनेता देव आनंद यांच्या म्हणण्यानुसार हे एक गाणे ऐकण्यासाठी त्यावेळी लोक जोधपूरच्या हवाई दलाच्या केंद्रावर तुफान गर्दी करायचे.

पश्चिम बंगालमधील 'बाऊल' परंपरेत कीर्तनाच्या स्वरूपात गायल्या जाणाऱ्या 'आन मिलो आन मिलो शाम सवेरे...' हे गाणे साहिर यांच्यातील प्रतिभावंत गीतकारावर जाणकारांच्या पसंतीचा शिक्कामोर्तब करणारे ठरले.

प्रेमातले गहिरेपण दाखवण्यासाठी साहिर त्यांच्या अनेक गाण्यांमध्ये निसर्गातील वेगवेगळ्या प्रतिमांचा अचूक वापर करायचे. 'ठंडी हवाएं लहराके आये...'नंतर देव आनंद व कल्पना कार्तिक यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या 'चुप है धरती चुप है चाँद सितारे...' या गाण्यातही साहिर यांनी तोच भन्नाट प्रयोग केला होता.

साहिर व सचिनदा ही जोड़ी आता हिट ठरली होती. गुरुदत्तचा 'प्यासा' हा चित्रपट साहिर-एसडी बर्मन जोडीच्या यशस्वी कारकिर्दीतील सर्वोच्च बिंदू म्हणावा लागेल. 'प्यासा' चित्रपटाच्या पोस्टरवर या दोघांचीही नावे झळकलेली दिसायची. मात्र, 'प्यासा'चे यश हे फक्त त्यातील गीत रचनांमुळे आहे, संगीतामुळे नव्हे, असे साहिर यांचे म्हणणे होते. एसडी बर्मन यांच्या ते जिव्हारी लागले आणि ही जोडी तुटली. पण 'प्यासा'तील त्यांच्या कलाकृती अजरामर ठरल्या. 

नंतर साहिर आणि ओ. पी. नय्यर ही जोडी जमली. या जोडीने 'नया दौर', 'तुमसा नही देखा' असे अनेक चित्रपट केले. १९५७मध्ये दिलीप कुमार व वैजयंती माला यांच्यावर चित्रित झालेल्या 'माँग के साथ तुम्हारा मैने माँग लिया संसार...' या घोडीगाडीतील उडत्या चालीच्या शब्दांनी तरुणाईला भारून टाकले होते. या शब्दांची जादू आजही संपलेली नाही.

साहिर व खय्याम यांनीही चित्रपटसृष्टीला अनेक अजरामर गीते दिली. मात्र, 'कभी कभी' चित्रपटासाठी साहिर यांनी लिहिलेले 'मै पल दो पल का शायर...' हे शब्द अनेकांना हेलावून सोडले. साहिर यांनी त्यातून तमाम शायरांची व्यथाच मांडल्याचे बोलले गेले.

हिंदी चित्रपटगीतांच्या क्षेत्रात साहिर यांनी दिलेल्या ऐतिहासिक योगदानामध्ये 'हम दोनो'ची ही गीते येतात. - 'अल्लाह तेरो नाम... कभी खुद पे कभी हालात पे... तसंच, मै जिंदगी का साथ निभाता चला गया...' अशी एकापेक्षा एक गाणी सांगता येतील. मात्र, 'अभी ना जाओ छोड कर...' यातील आर्तता शब्दांत पकडणे फक्त साहिरनाच शक्य होते.

'मन रे तू काहे ना धीर धरे' हे साहिर यांचे 'चित्रलेखा' चित्रपटातील गीत संगीतकार रोशन यांनी 'यमन' रागात बसविलेल्या आणि मोहम्मद रफी यांनी गायकीने एका उंचीवर नेले. ते खूप  गाजले.

पुढल्या पिढीच्या राहुल देव बर्मन यांच्यासाठीही साहिर यांनी गीतलेखन केले. 'आ गले लग जा'मधील त्यांच्या 'तेरा मुझसे है पहले का नाता कोई...'तील शब्दांनी अनेकांना भुरळ घातली.

असे साहिर. शांत स्वभावाचे व मीतभाषी साहिर मांडीवर काग़ज़ ठेवून लिहू लागले की शब्दांचे सोने होई. वयाच्या ५९ व्या वर्षी आजच्या दिवशी साहिर साहेबांनी जगाचा निरोप घेतला. ते शरीराने गेले पण त्यांचे शब्द ते तसेच मागे सोडून गेले.

'गुमराह' चित्रपटातील त्यांची ही दर्दभरी विराणी नेहमीच काळात चिरून जाते :

चलो इक बार फिर से 

अज़नबी बन जाएँ हम दोनों
न मैं तुमसे कोई उम्मीद 
रखो दिलनवाज़ी की
न तुम मेरी तरफ देखो 
गलत अंदाज़ नज़रों से
न मेरे दिल की धड़कन 
लडखडाये मेरी बातों से
न ज़ाहिर हो हमारी 
कशमकश का राज़ नज़रों से
तुम्हे भी कोई उलझन 
रोकती है पेशकदमी से
मुझे भी लोग कहते हैं की 
ये जलवे पराये हैं
मेरे हमराह भी रुसवाइयां हैं 
मेरे माजी की
तुम्हारे साथ में गुजारी हुई 
रातों के साये हैं
तआरुफ़ रोग बन जाए 
तो उसको भूलना बेहतर
तआलुक बोझ बन जाए 
तो उसको तोड़ना अच्छा
वो अफसाना जिसे 
अंजाम तक लाना न हो मुमकिन
उसे इक खूबसूरत मोड़ देकर 
छोड़ना अच्छा
चलो इक बार फिर से 
अज़नबी बन जाएँ हम दोनों



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies