प्रत्येक मुलगी ही महालक्ष्मी आहे,तिचा आदर करा ,तिला तिच्या पायावर उभे करा-योगेश आगज
आदित्य दळवी/सोहेल शेख
महाराष्ट्र मिरर टीम -कर्जत
नवरात्रीची नवलाई
स्पेशल स्टोरी
आपल्याकडे सण उत्सवांना फार महत्व असते.त्या सणांचे औचित्यपण तसंच असतं. सण असला म्हणजे गोडधोड खाणं ,नटण,मुरडण अशा गोष्टी असतात शिवाय उत्सवामागे एक पौराणिक कथेचा आधार असतो,त्यामुळे नवरात्र उत्सव हा अंबामाता, महालक्ष्मी, तुळजाभवानी या देवींच्या आराधनेचा,पूजेचा दिवस असतो.
आणि दहाव्या दिवशी दसरा असतो.तुम्ही म्हणाल हे सगळं आम्हाला माहिती पण या सणासुदीला महिलांचा आदर करा,मुली वाचवा असं कोणी सांगत असेल तर ती वेगळीच बातमी बनते. त्याचे अस झालं की कर्जतमधील योगेश आगज आणि ऋतिका आगज या दोन्ही कायद्याच्या विद्यार्थ्यांचे सहा वर्षांपूर्वी लग्न झालं आणि त्यांना दोन वर्षांनंतर मुलगी झाली या मुलीचे नाव क्रिशा आहे.
क्रिशा जन्माला आली त्यावेळी आगज यांच्या घरात कमालीचा आनंद झाला होता पाचवी बारशापासून सगळे कार्यक्रम धुमधडाक्यात साजरे केले.मात्र क्रिशा जन्माला आली त्यावेळी पहिल्या दसऱ्याला सकाळी तिचे घरातील सगळ्या कडून विधिवत पूजन होते,ताम्हणात तिचे दोन्ही पाय ठेवून त्यांना स्नान घालून तिला औक्षण केलं जातं,महालक्ष्मीच्या पावलांनी आपल्या घरात प्रवेश करणारी मुलगी ही देवता समान आहे अशी धारणा क्रिशाचे वडील योगेश सांगतात,दसऱ्याच्या मुहूर्तावर क्रिशाचे पूजन गेले चारवर्षा पासून सुरू आहे.वंशाला मुलगाच हवा किंवा समाजात मुलीला दुय्यमस्थान देणार्याना हे आदर्शवत उदाहरण आहे.असेही योगेश पुढे सांगतात.
जिथे घरातील मुलीला महालक्ष्मी, अंबामाता म्हणून पूजल जातं,तिचा आदर,सन्मान होतो त्या घराचा आदर्श समाजाने घेण्यासारखा आहे.