Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

भाऊ लढतोय अजूनही... समाजाची_साथ_हवी_आहे.....

 भाऊ लढतोय अजूनही... 

समाजाची साथ हवी आहे.....

 निवास पाटील-सांगली३० सप्टेंबरच्या रात्री आलेल्या पावसाने फुगलेल्या भिंतीने साथ सोडली आणि *अमोल कदम यांचे राहते घर पडले. * सुदैवाने घरात कुणाला काही इजा झालेली नाही. राहिलेल्या तीन भिंतीही फुगलेल्या आहेत. कधी पडतील काही भरवसा नाही. गरीबीत जन्माला आला, प्रचंड संघर्ष केला, दोन पायऱ्या वरती चढण्यात यशस्वी झाला की एखादा मोठा आघात होतो आणि पुन्हा पाच पायऱ्या खाली जावे लागते. नाउमेद होऊन चालत नाही. जीवन थांबत नाही याची जाणीव सतत डोक्यात ठेऊन काम करत राहण्याची सवय त्याला लागली आहे. 

डोक्यात असलेल्या प्रतिभेला खिशात नसलेल्या पैशाने बऱ्याचदा हरवले आहे. परिस्थितीशी किती लढायचे? किती आघात पचवायचे? हे प्रश्न त्याच्यापुढे बाकीच आहेत. 


झालेले आघात

चार वर्षे मुंबईत भाड्याची खोली नसतानाही रस्त्यावर राहून उद्योजक निर्मितीसाठी प्रचंड प्रयत्न केले. 
प्रचंड मेहनतीतून सुरू केलेल्या प्रकाशनाची टीम जवळच्या मित्राने उधवस्त करून टाकली.
ठाण्याजवळच्या मुलुंड येथे ओळखीच्याच माणसांनी हल्ला करून लॅपटॉपसहित सगळे साहित्य बिझनेस प्लॅन प्राप्त करण्यासाठी हडपले.
पुस्तक प्रकाशनासाठी ज्या दुकानात पैसे दिले तो दुकानदारच गायब झाला. 
 बिझनेस पार्टनरनी साथ सोडली.
 वडिलांचे छत्र अचानक हरपले.
 थोडी उभारी घेत असतानाच भिंती फुगलेले घर पडले. 

या सगळ्या प्रसंगात समाजातील काही चांगल्या लोकांनी मदत केली, तोही चांगला प्रतिसाद देत काम करत राहिला. खिशात पैसा नसला म्हणून मोठी स्वप्ने पाहू नयेत असे काही नसते. मात्र ती स्वप्ने साकार करण्याच्या गतीला खीळ लावण्याचा प्रयत्न परिस्थिती करत असते. त्यातून वर उठण्यासाठी प्रयत्न करत राहणे हे जिवंत असल्याचे लक्षण आहे. 


त्याच्या फाटक्या परिस्थितीत त्याने केलेले काम

 
४१ वेळा रक्तदान
१२ पुस्तकाचे लेखन
नवी अर्थक्रांती प्रकाशनाची स्थापना करून लाखो तरुणांना व्यावसायिक मार्गदर्शन
प्रतिभावान तरुणांना नोकरी सोडायला लावून ०६ आयटी कंपन्या सुरू करून दिल्या.
महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात जाऊन ग्रामीण भागातल्या तरुणांना मार्गदर्शन 
दीड लाख किलोमीटर एसटीचा प्रवास
एक वर्षापासून नवी अर्थक्राती सर्व सेवा केंद्र चालू आहे. 


या क्षणाला आपल्याकडून मिळालेली मदतही त्याच्यासाठी लाखमोलाची ठरेल. त्याला आज मदत केली तर उद्या काही उद्योजक नक्कीच तयार होतील. तरी आपण फूल नाही निदान फुलाची पाकळी म्हणून आर्थिक मदत करुया.

त्यांच्या बॅक खात्याची माहिती खालील प्रमाणे

#Bank_Details

Amol Chandrakant Kadam

Bank of India Atpadi Branch

Account No. 150210510000132

IFS Code BKID0001502


आपण त्यांना डिजिटल पेमेंट्स सुद्धा करु शकता त्यांचा Google Pay व Phone Pay नंबर 

         9767002958

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies