वाढीव पाणीपट्टी विरोधात खोपोलीतील पत्रकारांनी घेतली नगराध्यक्षांची भेट,अनेक त्रुटिंवर झाली चर्चा.
दत्तात्रय शेडगे-खोपोली
खोपोली नगरपालिकेने कोरोनाच्या महामारीत अचानकपणे पाणीपट्टी वाढवून आधीच कंबरडे मोडलेल्या नागरिकांना झटका दिल्याने खोपोलीतील पत्रकारांनी नगराध्यक्षा सुमन औसरमल,मुख्याधिकारी गणेश शेट्टे यांची भेट घेऊन वाढीव पाणीपट्टी कमी करावी यासाठी सकारात्मक चर्चा करीत पाणी पुरवठा विभागात असलेल्या त्रुटी लक्षात आणून दिल्या.
मार्च महिन्यापासून कोरोनाच्या महामारीमुळे देशभरात लॉकडाऊन असल्यामुळे कामधंदे नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे अशा परिस्थितीत खोपोली नगरपालिकेने अचानकपणे पाणीपट्टी कर भरमसाठ वाढवीत खोपोलीकरांना मोठा झटका दिला आहे अनेकांच्या पाणीपट्टीचे बिल दीडपट वाढविल्याने लॉक डाऊन काळात मेटाकुटीस आलेल्या नागरिकांना हा सर्वात मोठा झटका असल्याचे बोलल जातंय.
या संदर्भात खोपोलीतील जागृत पत्रकारांनी खोपोली नगरीच्या नगराध्यक्षा सुमन औसरमल,उपनगराध्यक्षा विनिता औटी,मुख्याधिकारी गणेश शेट्टे यांची भेट घेतली यावेळी सर्व पत्रकारांनी आधीच मेटाकुटीला आलेल्या नागरिकांवर पाणीपट्टीचा बोझा वाढवू नका अशी मागणी करीत आहे तीच ठेऊन पुढील वर्षी वाढवा अशी चर्चा केली तसेच पाणी पुरवठा विभागात अनेक त्रुटी असून त्याकडे जास्त लक्ष दिले तर मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होईल जेणेकरून आर्थिक बचतही होईल अश्या सूचनाही करण्यात आल्या.यावेळी माजी नगराध्यक्ष काशीनाथ गायकवाड,नगरसेवक किशोर पानसरे यांसह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते