कृषी विधयेकाच्या स्थगन अध्यादेशाची कर्जत भाजपने केली होळी - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Wednesday, October 7, 2020

कृषी विधयेकाच्या स्थगन अध्यादेशाची कर्जत भाजपने केली होळी

 

 कृषी विधयेकाच्या स्थगन अध्यादेशाची कर्जत भाजपने केली होळी

महाराष्ट्र मिरर टीम-कर्जतआज कर्जत भाजपा वतीने तहसील कार्यालयासमाेर केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे मंजूर केलेले कृषी विधेयक बिल महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारने  महाराष्ट्रात लागू  न केल्याबद्दल शेतकऱ्यांचे अताेनात नुकसान होत आहे म्हणून या सरकारचा  जाहीर निषेध करुन  राज्य सरकारने काढलेल्या स्थगन अध्यादेशाची  होळी करण्यात आली तसेच मुखमंत्र्यांना तहसीलदारांच्या मार्फत अध्यादेश रद्द करावा असे निवेदन देण्यात आले. यावेळी कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर जिल्हा उपाध्यक्ष वसंतराव भोईर किसान मोर्चाचे कोकण संपर्क प्रमुख सुनील गोगटे ,प्रदेश सचिव अशोक गायकर ,किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष परशुराम म्हसे ,रमेश मुंढे,उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल नगरसेवक घुमरे ,स्वामीनी मांजरे ,विशाखा जिनगरे महिला तालुका अध्यक्ष स्नेहा गोगटे, लीना गांगल, शिवाजी पाटील  प्रकाश पालकर ,मंदार मेहेंदळे ,विजय जिनगरे ,विनायक पवार ,सचिन म्हसकर ,वसंत महाडिक, मयुरेश शितोळे ,विशाल  कोकर,सर्वेश गोगटे ,सुजल गायकवाड ,रुत्वीक आपटे असे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.No comments:

Post a Comment