आ.भास्कर जाधव यांच्या भेटीनंतर चिपळूणची युवा सेना चार्ज..!!
ओंकार रेळेकर-चिपळूण
चिपळूण तालुका युवा सेना आणि चिपळूण शहर युवा सेनेच्या प्रमुख पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी आज आमदार श्री. भास्करराव जाधव यांची त्यांच्या शिवसेना संपर्क कार्यालयात भेट घेवून विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी आ.भास्कर जाधव यांनी ९०च्या दशकामध्ये त्यांच्या तरूणपणाच्या काळात शिवसेना रूजविण्यासाठी केलेल्या संघर्षाची अनेक उदाहरणे देवून त्यांच्यातला उत्साह वाढवला आणि त्यांना चार्ज केले.
युवा सेना तालुका अधिकारी उमेश खताते आणि शहर अधिकारी निहार कोवळे यांनी त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह आ.भास्कर जाधव यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी अनेक विषयांवर चर्चा सुरू असताना आ. जाधव यांनी १९८४ पासूनचा संघर्षाचा काळ या युवकांसमोर ठेवला. काॅंग्रेसची फार मोठी मातब्बर मंडळी तालुक्यात सक्रिय असताना आणि त्यांचा प्रचंड दरारा असताना या प्रस्थापितांविरोधात उभं ठाकणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. परंतु, शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांची ज्योत आमच्या नसानसात भिनलेली होती आणि कसलीही पर्वा न करता आम्ही हे विचार तळागाळापर्यंत पोहोचवत होतो. हे करीत असताना प्रसंगी जीवावर बेतणारे अनेक प्रसंग ओढवले. तरीदेखील चिकाटीने, धैर्याने सर्वांना सामोरे गेलो. घेतलेली प्रचंड मेहनत, मातब्बरांविरोधात केलेले दोन हात याचे अनेक किस्से सांगून त्यांनी युवा पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये उत्साह जागवला.
यावेळी तालुका सचिव प्रतिक शिंदे, युवती तालुका अधिकारी नेहा शिंदे, उपतालुका अधिकारी अवधूत शिर्के, सागर सावंत, ऋशिकेष नलावडे, नितीन जाबरे, संजय चांदे, उपशहर अधिकारी पार्थ जागुष्टे, खेर्डी विभाग अधिकारी विराज खताते, सावर्डे विभाग अधिकारी भूपेश सावर्डेकर, दहिवली विभाग अधिकारी शरद भुवड, ओवळी विभाग अधिकारी अवि कदम, कोंढे विभाग अधिकारी साहिल शिर्के, अखिलेष खेडेकर आदी उपस्थित होते