श्री जानाई मळाई सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन संस्थेतर्फे कोविड योद्धा पुरस्कार वितरण सोहळा
प्रतिक मिसाळ सातारा
सातारा -कोविड 19 महामारी काळात आपले जीवित धोक्यात घालून सेवाकर्तव्य बजाविणाऱ्या " संस्था कार्यक्षेत्रातील " सुमारे 85 अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका, वैद्यकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांना, संस्था वर्धापनदिन सोहळ्याचे औचित्य साधून " कोविड योद्धा पुरस्कार " कोरेगाव चे लोकप्रिय आमदार महेश शिंदे यांचे शुभहस्ते प्रदान करून गौरविले होते.
उर्वरित राहिलेल्या कोविड योध्या ना गौरविण्यासाठी संस्था कार्यालयात छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
हा कार्यक्रम कोरेगाव तालुक्यातील जेष्ठ समाजसेविका, प्रख्यात नेत्रचिकित्सक डॉ.अरुणाताई बर्गे यांचे शुभ हस्ते , संस्थेचे संस्थापक - अध्यक्ष शिवराम लक्ष्मण माने गुरुजी यांचे उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी कोडोली पंचक्रोशीतील 45 कोविड योद्धा ना शाल, पुष्प, स्मृतीचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.
डॉ.अरुणाताई बर्गे यांनी कोविड 19 महामारी काळात आपले जीवित धोक्यात घालून " तन - मन - धन ^ अर्पूण केलेल्या रुग्ण सेवे बद्दल,कार्याबद्दल याप्रसंगी त्यांचा "कोविड महायोद्धा" पुरस्कार संस्थापक - अध्यक्षांच्या हस्ते प्रदान करून गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास संस्थेचे संचालक , संस्थेच्या सर्व शाखांचे मुख्याध्यापक, शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.