'शिवगंध' पुस्तकाचे शरद पवार यांचे हस्ते प्रकाशन - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Saturday, October 24, 2020

'शिवगंध' पुस्तकाचे शरद पवार यांचे हस्ते प्रकाशन

 'शिवगंध' पुस्तकाचे शरद पवार यांचे हस्ते प्रकाशन

महाराष्ट्र मिरर टीम-मुंबई


आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लिहिलेल्या व डिंपल प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या "शिवगंध" या पुस्तकाचे प्रकाशन, शरद पवार यांच्या निवासस्थानी, सिल्व्हर ओक येथे ऑनलाईन पद्धतीने झाले. 

याप्रसंगी बोलताना खासदार शरद पवार  यांनी डॉ अमोल कोल्हे यांचे कौतुक केले. ते म्हणाले, "नारायणगावामधून येऊन एक दर्जेदार डॉक्टर, तितकाच उत्तम अभिनेता आणि आपल्या खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये पहिल्याच वर्षी संसद रत्न पुरस्कार मिळवणारा संसदपटू असणाऱ्या डॉ अमोल कोल्हे यांची वाटचाल मी जवळून पाहतो आहे. माझे स्नेही डॉ रवी बापट हे मला सुरुवातीपासून डॉ अमोल कोल्हे यांच्याबद्दल सांगत असत. 'राजा शिवछत्रपती' या गाजलेल्या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करत असताना आलेल्या अनुभवांविषयी, त्यासाठी घेतलेल्या मेहनतीविषयी त्यांनी 'शिवगंध' या पुस्तकात रंजकतेने लिहिलं आहे. डॉ. नीतिन आरेकर यांनी त्यांचे अनुभव तशाच रंजकतेने शब्दांकित केले आहेत. महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचलं पाहिजे." यावेळी खासदार सुप्रिया सुळे, लेखक आणि खासदार डॉ अमोल कोल्हे, पुस्तकाचे शब्दांकनकार डॉ नीतिन आरेकर, डिंपल प्रकाशनाचे अशोक मुळ्ये, कौतुक मुळ्ये, हॉटेल प्रीतमचे संचालक अमरदीपसिंग कोहली आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment