रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित पोवाडा गायन स्पर्धेतील लहान गटाचा निकाल जाहीर. - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Thursday, October 1, 2020

रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित पोवाडा गायन स्पर्धेतील लहान गटाचा निकाल जाहीर.


पोवाडा गायन स्पर्धेतील लहान गटाचा निकाल जाहीर.

राम जळकोटे-उस्मानाबाद         रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या सेवाभावी संस्थेच्या वतीने महाराष्ट्र भव्य पोवाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यातील लहान गटाचा निकाल दि.१.ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आला आहे.यशस्वी विजेत्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.यामध्ये प्रथम क्रमांक. सिद्धी घाडगे , द्वितीय क्रमांक.शर्वरी फणसे,तृतीय क्रमांक. आर्या मोरे इ. स्पर्धकांनी आपल्या अनमोल कलेतून उत्तुंग यश मिळवलं आहे.

रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान च्या अध्यक्षा, अभिनेत्री.अश्विनी महांगडे यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा प्रतिष्ठानचे विविध भागांतील सदस्य यांच्या माध्यमातून पार पडली. अध्यक्षा महांगडे यांच्यासह स्पर्धेचे संयोजक वर्ग यांनी विजेत्या स्पर्धेकांचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.No comments:

Post a Comment