Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

चित्रपट क्षेत्रातील कामगारांच्या सेवेसाठी देवा ग्रुप चित्रपट संघटना सरसावली

 चित्रपट क्षेत्रातील कामगारांच्या सेवेसाठी देवा ग्रुप चित्रपट संघटना सरसावली

सभासद नोंदीसह समस्यांचा करणारा निपटारा

आदित्य दळवी-
महाराष्ट्र मिरर टीम


ठाण्यातील देवा ग्रुप चित्रपट संघटनेचे अध्यक्ष रोहित चंद्रकांत गायकवाड यांनी नुकतेच ठाणे-पालघरातील मराठी कलाकारांच्या समस्यांसाठी सरसावले असून देवा ग्रुप संघटना कार्यरत राहिल त्यासाठी सभासद नोंदणी सुरू करण्यास सुरूवात केली आहे. 

ठाण्यातील मंत्रा स्नॅक्सचे मराठी उद्योजकाने दुबईत येवून ठाण्यात व्यवसाय सुरू केला आहे त्याप्रमाणे ठाणेकर तरुणांनी कोरोना काळात आता घराबाहेर पडून केवळ नोकरीच्या पाठीमागे न लागता उद्योग व्यवसायात शिरकाव केला पाहिजे. 
मराठी तितुका मेळवावा। महाराष्ट्र धर्म वाढवावा॥
रामदास स्वामींनी ही जी शिकवण आपल्याला दिली याचा कुठे तरी विसर पडत आहे. याची आठवण ठाण्यातील देवा ग्रुप चित्रपट संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रोहित गायकवाड यांनी मराठी तरुणांना आपल्या आवाहनातून केली आहे.
मराठी उद्योजक कसा पुढे येऊ शकतो याचे स्पष्ट उदाहरण रोहित गायकवाड आणि देवा ग्रुप चित्रपट संघटनेतील सर्व पदाधिकारी यांनी मराठी तरुणांना  पटवून दिले देवा ग्रुप चित्रपात संघटनेतील महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रोहित गायकवाड, ठाणे जिल्हा अध्यक्ष जुई खाडे,  ठाणे शहर अध्यक्ष स्वाती लंके, ठाणे शहर सांस्कृतिक विभाग अध्यक्षा डिंपल भोरपकर, पालघर जिल्हा अध्यक्ष अभिजित ऐवळे आणि देवा ग्रुप ठाणे शहर सभासद महंत पवार  फाउंडेशनचे सभासद पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies