राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार रत्नाकर गुट्टे यांची निवड,
दत्ता शेडगे-खोपोली
राष्ट्रीय समाज पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी आमदार रत्नाकर गुट्टे यांची नुकतीच वर्णी लागली,
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांनी रासपची पाळेमुळे १७ राज्यात रुजवली आहेत, त्यात महाराष्ट्र हा रासपचा गड आहे.
आज मुंबई येथे राष्ट्रीय समाज पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली रासपच्या प्रदेशाध्यक्ष पदी गंगाखेड मतदार संघाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांची नुकतीच निवड करण्यात आली,