दुहेरी वाहनांच्या अपघातात सापडला महाकाय अजगर सर्पमित्रांनी दिले त्याला जीवदान - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, October 4, 2020

दुहेरी वाहनांच्या अपघातात सापडला महाकाय अजगर सर्पमित्रांनी दिले त्याला जीवदान

 दुहेरी वाहनांच्या अपघातात सापडला महाकाय अजगर

सर्पमित्रांनी दिले त्याला जीवदान


महाराष्ट्र मिरर टीम-खोपोली खंडाळा घाटात दि. 3 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 9 वाजताचे दरम्यान सायमाळ येथील टाटा कॅम्प दोन वाहनांचा अपघात झाला होता. अपघात तसा गंभीर होता परंतू सुदैवाने कोणी जखमी झाले नव्हते. वाहतूक व्यवस्थित सुरू होती मात्र त्याच अपघातात बाधित झालेल्या टँकरच्या मागच्या चाकाखाली अजगर जातीचा साप अडकला होता. ही खबर तब्बल 10 तासांनी  स्नेक रेस्क्युअर्स खोपोली  आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांना समजली. लागलीच घटनास्थळी जाऊन त्या अजगराला वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. क्रेन आणि मानवी प्रयत्नांच्या समनव्यातुन सरपटणाऱ्या जातीतील तो अजस्त्र अर्थात 8 ते 9 फूट लांबीचा सर्प शेवटी सुखरूप बाहेर काढला गेला. त्याला जखम झालेली असली तरी नैसर्गिकरित्या ती भरून निघेल असे सर्पमित्रांचे मत आहे. अजगराच्या वाचण्याची सुमारे बारा तासाची अनिश्चितता संपली. त्या अजगराला नंतर सुखरूप वनक्षेत्रात मुक्त करण्यात आले.


आज आंतरराष्ट्रीय प्राणी दिन असल्याने योगायोगाने असे रेस्क्यू ऑपरेशन पार पाडण्याची जोखीम उचलणारे दिनेश ओसवाल, योगेश शिंदे, विजय भोसले, बाळकृष्ण किलंजे, सुंदर शर्मा, गुरुनाथ साटेलकर यांना वेगळे समाधान लागल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.


एवढ्या वर्षाच्या अनुभवात अश्या घटनेला पहिल्यांदाच सामोरे गेलो मात्र त्या अजगराला वाचवण्यासाठी केलेले आमचे  प्रयत्न याशिवाय झाल्याचे समाधान लाभले असे सर्पमित्र दिनेश ओसवाल यांनी प्रतिपादन केले

No comments:

Post a Comment