Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

खंडणीचा गुन्हा दाखल असलेला फरारी वनकर्मचाऱ्यास बोरगाव पोलिसांकडून अटक

 

खंडणीचा गुन्हा दाखल असलेला फरारी वनकर्मचाऱ्यास बोरगाव पोलिसांकडून अटक

प्रतिक मिसाळ सातारा


पिरेवाडी ( ता.सातारा ) येथील युवकाला शिकारीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत त्याच्याकडून पंचवीस हजार रुपये उकळल्या प्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या चार वन कर्मचार्यांपैकी एकाला बोरगाव पोलिसांनी बुधवारी रात्री ताब्यात घेतले . महेश साहेबराव सोनवले ( वय .२८ , रा.घोट , ता.पाटण ) असे या वन कर्मचाऱ्याचे नाव आहे . गुरुवारी त्याला जिल्हा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले . या प्रकरणातील वनपालासह अन्य दोन वनसंरक्षक अद्याप पोलिसांना गुंगारा देत आहेत . पिकांचे संरक्षण करण्यासाठी गेलेल्या पिरेवाडी येथील ओंकार शामराव शिंदे या युवकाला वनविभागाच्या चार कर्मचाऱ्यांनी शिकारीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्याच्याकडून पंचवीस हजार रुपये उकळले होते . ही घटना ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली होती . याची तक्रार ओंकार शिंदे याने ५ सप्टेंबरमध्ये बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल केली होती . पोलिसांनी वनाधिकारी योगेश पुनाजी गावित , वनसंरक्षक महेश साहेबराव सोनवले , रणजित व्यंकटराव काकडे , किशोर ज्ञानदेव ढाणे या चौघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता.गुन्हा दाखल झाल्यापासून हे चौघेही पोलिसांना गुंगारा देत होते . या दरम्यान त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला होता . तर उच्च न्यायालयात जामीन अर्ज फेटाळणार हे लक्षात येताच संशयितांनी अर्ज मागे काढून घेतला होता . अखेर बुधवारी सायंकाळी वनसंरक्षक महेश सोनवले याला बोरगाव पोलिसांनी ताब्यात घेतले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies