Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

साताऱ्यात भाजप महिला मोर्चाच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात"आक्रोश" जनआंदोलन

 

साताऱ्यात भाजप महिला मोर्चाच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात"आक्रोश" जनआंदोलन

प्रतिक मिसाळ -सातारा महाविकास आघाडी सरकारच्या धिक्काराच्या घोषणा देत भारतीय जनता पक्षाची जिल्हा शाखा व महिला मोर्चाच्या वतीने आज  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले . महिलांच्या सुरक्षिततेबाबत राज्य शासन असंवेदनशील व निष्क्रिय ठरले असून त्यांनी तातडीने पायउतार व्हावे , तसेच महिला सुरक्षिततेबाबत त्वरित एसओपी प्रणाली सुरू करावी , अशी मागणी या वेळी आंदोलकांनी केली . भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा डॉ . सुरभी भोसले व महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सुवर्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महिला पदाधिकारी , भाजप सातारा शहर व सातारा तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते . यावेळी महिलांवरील अत्याचार रोखण्यात राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरल्याबद्दल निषेध नोंदविण्यात आला . यासंदर्भात दिलेल्या निवेदनात महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुरभी भोसले यांनी म्हटले की , महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत आहे . बलात्कार , अत्याचार , विनयभंग व हत्याकांडाचे सत्र सुरूच आहे . कोरोनाच्या महामारीच्या काळात कोविड सेंटर व हॉस्पिटलमध्ये महिलांवर अत्याचार व विनयभंगाचे प्रकार होत आहे . भाजप महिला मोर्चाने प्रत्येक घटनेचे गांभीर्य ओळखून या घटनांचा पाठपुरावा केला आहे . पीडित महिलांच्या कुटुंबिय , स्थानिक पोलिस ठाण्यात भेट देऊन कारवाईची मागणी केली . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदने पाठविली . मात्र , या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यास प्रतिसाद देण्याची शिष्टाई मुख्यमंत्र्यांनी दाखविली नाही . हे सरकार महिला सुरक्षिततेबाबत किती असंवदेनशील व निष्क्रिय आहे , हेच यातून स्पष्ट झाले आहे . त्यामुळे ठाकरे सरकारने पायउतार व्हावे .असे निवेदनात म्हंटले आहे. यावेळी रीना बनगे , मोनाली पवार , सिद्धी पवार , आशा पंडित , सुनिशा शहा , मनीषा पांडे , वैष्णवी कदम , नजमा बागवान , पल्लवी गायकवाड , सारिका मदने , कोमल अनपट , पूनम बाबर , शमीन शेख , पूनम पवार , विठ्ठल बलशेटवार , विकास गोसावी , राजेंद्र इंगळे , ऍड . प्रशांत खामकर , राहुल शिवनामे , सतीश भोसले , सुनील जाधव , मिलिंद काकडे , धनंजय जांभळे , नंदकुमार यादव , जयदीप ठुसे , विक्रांत भोसले , गणेश पालखे , शैलेंद्र कांबळे , उत्कर्ष रेपाळ , डॉ . सचिन साळुखे , विवेक कदम , किशोर पंडित आदी उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies