शेतीशी निगडीत नवीन तंत्रज्ञान वापरून चितळे समूहाची वाटचाल - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, October 12, 2020

शेतीशी निगडीत नवीन तंत्रज्ञान वापरून चितळे समूहाची वाटचाल

शेतीशी निगडीत नवीन तंत्रज्ञान वापरून चितळे समूहाची वाटचाल

उमेश पाटील-सांगली             

                    "ऍग्रीकल्चरल सक्सेस स्टोरी"


 शेतकरी व ग्राहक यांना केंद्र बिंदू मानून चितळे उद्योग समूहाने ८० वर्षात संपूर्ण देशात व देश बाहेर नाव लौकिक मिळवलं आहे . कृषी क्षेत्राशी निगडित चौथी पिडी या क्षेत्रात उतरली आहे. अशी माहिती चितळे उद्योग समूहाचे पार्टनर विश्वासराव चितळे साहेबांनी दिली.

            ते ग्रामीण जागृतता कार्यक्रम अंतर्गत महात्मा कृषी विद्यापीठ संलग्नित रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज ची विद्यार्थीनी मृणाल सुहास पाटील हिने "ऍग्रीकल्चरल सक्सेस स्टोरी" या विषयावर घेतलेल्या मुलाखतीत अशी माहिती दिली याशिवाय त्यांनी चितळे उद्योग समूहाचे माझे आजोबा भारत गणेश चितळे यांनी ८० वर्षा पूर्वी स्थापन केलेल्या सर्व उध्योग समूहाच्या सर्व चढ-उताराची माहिती दिली .

          चितळे उद्योग समूहमार्पतशेतकरी वर्गाची आर्थिक सुभता उंचवण्याच्या दृष्टीने आधिक दूध देणाऱ्या संकरित गाय व म्हशी बाहेरून आणून दिल्या विविध चर्चा सत्रे राबून नवनवीन तंत्रज्ञान वापरून चितळे समूहाने शेतीशी निगडित शेतकरी व उच्चप्रतीचे गोडीचे पदार्थ बाजारात आणून गेली 80 वर्षे ग्राहक वर्गही टिकवून ठेवला आहे.

      हा उद्योगसमूह आज जगभरात नावारूपाला आणण्यासाठी नानासाहेब काकासाहेब सह आजची युवा चितळे पिढी तंत्रज्ञान घेऊन कार्यरत आहे असेही त्यांनी सांगितले.

याशिवाय त्यांनी आजोबा पासून आजच्या चौथी पिढी पर्यंत सर्व चितळे कुटुंबाचे हे यश असल्याचे सांगितले.

              या मुलाखतीसाठी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष जयसिंग मोहिते-पाटील,समन्वयक डी. पि.कोरटकर ,प्राचार्य आर.जि. नलवडे व कार्यक्रम अधिकारी एस.एम.एकतपुरे यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment