जिल्ह्यातील नवदूर्गा आदिशक्तीच्या रुपात संकटांशी करतायत मुकाबला
संकटसमयी आदीशक्तीचा वरदहस्त
रविंद्र कुवेसकर-उतेखोल/माणगांव
नवदुर्गा स्पेशल स्टोरी
नवरात्री उत्सव साधेपणात साजरा केला जात आहे या वर्षात संकटांची नुसती मालीकाच नाही तर वैश्विक संकटाने संपूर्ण जगच हैराण आहे. अशा कठीण काळात
या नवरात्री उत्सवा निमीत्ताने आदिशक्तीचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यात महिलांचे प्रातिनिधीक स्वरुपात आदर्श म्हणुन अग्रस्थानी प्रशासनाच्या प्रमुख जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी आणि जिल्ह्याचे पालकत्वच नाही तर राज्यमंत्री, उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहीती व जनसंपर्क, विधी व न्याय या खात्यांची महाराष्ट्र शासनाची जबाबदारी लिलया पेलताना साक्षात आदिशक्तीच्या रुपात नावा प्रमाणेच आदिती तटकरे युवाशक्तीचे सक्षम नेतृत्व यांचे नाव जिल्ह्यात अग्रस्थानी असून त्यांच्या कार्याकडे लोक कुतुहलाने पाहत अभिनंदन करीत आहेत.
जिल्ह्यातील भौगोलिक दृष्ट्या मोठा तालुका माणगांव मध्ये देखिल महिलाराज असून साक्षात या आदिशक्तीचे दर्शन घडते, असे म्हणने वावगे ठरु नये ! कारण या नगरीतील प्रांताधिकारी प्रशाली जाधव/दिघावकर, तहसिलदार प्रियंका आयरे, जिल्हासत्र न्यायालयाच्या मा. न्यायाधीश पी पी बनकर तसेच मा. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी ए. सी. रोकडे व व्हि. आर. कुलकर्णी, नगराध्यक्षा योगिता चव्हाण, पंचायत समिती सभापती अलका जाधव, गट शिक्षण अधिकारी सौ. चांदोरकर, पोलीस उपनिरिक्षक प्रियंका बुरुंगळे ही प्रातिनिधीक नावे आहेत. तर अनेक प्रशासकिय महिला कर्मचारी, महीला डाॅक्टर, शिक्षिका, आरोग्य सेविका महीला उद्योजक येथे मोठ्या धाडसाने कार्य करीत आहेत. अशाच प्रकारे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये तसेच इतरत्र कार्यरत
महिलाशक्ती अर्थात जिजाऊच्या लेकी साक्षात देवी दूर्गेच्या रुपात आपापल्या जबाबदाऱ्या लिलया पेलताना दिसून येत आहेत.
डाॅक्टर, पोलीस, आरोग्यसेवक यांचे कार्याची महती अनन्य साधारण आहे या मध्ये अनेक ज्ञात अज्ञात माणसांनी माणुसकीचे महत्वपूर्ण दर्शन घडविले आहे. अगदी कोरोना संक्रमणात दुर्दैवी मृत्युमुखी पडलेल्यांवर अंतिम संस्कार करणारे स्थानिक प्रशासनाचे चतूर्थ श्रेणीतील स्वच्छतादूतांचे, साध्या सेवकांचे हातून घडलेले पुण्याचे कार्य हे मानवजातीला विसरता येणार नाही. या सर्वच ठिकाणी एका अज्ञात शक्तीची अर्थात आदिशक्तीचा वरदहस्त खुप कामी आला आहे. ही आदिशक्ती म्हणजेच घरातील महिलांना या काळात प्रचंड जबाबदारी पेलावी लागली आहे. घरात लाॅकडाऊन काळात घरच्या कुटुंबियांची अबालवृध्दांची सेवा सुश्रुषा काळजी घेत वेळेवर त्यांच्या गरजा पुरवित, आलेल्या संकटाचा सामना करीत यशस्वीपणे लढताना दिसत आहेत. नवरात्रौत्सवानिमीत्त जिल्ह्यातील जनता या महिलाशक्तीकडे कौतुकाने पाहत आहे.