Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

संपूर्ण माणगाव शहराचे होणार मोफत निर्जन्तुकीकरण,माझे शहर...माझी जबाबदारी...नावाचा शेकाप युवानेते निलेश थोरे मित्रमंडळाचा अनोखा उपक्रम

 संपूर्ण माणगाव शहराचे होणार मोफत निर्जन्तुकीकरण,माझे शहर...माझी जबाबदारी...नावाचा शेकाप युवानेते निलेश थोरे मित्रमंडळाचा  अनोखा उपक्रम

संतोष सुतार-माणगांव



 पावसाळ्यात व पाऊस झाल्यानंतर ऑक्टोबर हिट च्या सुरुवातीला ताप, हिवताप, डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस आदी साथीचे आजार सुरू होतात.पावसाळ्यात ओला झालेला कचरा आणि त्यात झालेले विषाणू,जीवजंतू,किटक व मच्छर यांची पैदास होऊन ऑक्टोबर महिन्यात ऑक्टोबर हिट सुरु होत असल्याने सदर जीवजंतूंची प्रचंड प्रमाणात वाढ़ होऊन त्यांचा प्रादुर्भाव वेगाने पसरत असतो.यापूर्वीच जनतेचे कोरोना व्हायरस ने पुरते कंबरडे मोडले असून गेले 3 ते 4 महिने पडलेला मुसळधार पाऊस अगदी मागील आठवड्यापर्यंत चालू होता.त्यानंतर वातावरणात कमालीची उष्णता जाणवत असून प्रखर ऊन पडते आहे.वातावरणाच्या ह्या बदलांमुळे माणगाव शहरात सध्या प्रचंड प्रमाणात मच्छर व तत्सम किटक,विषाणू यांचा प्रसार झाला आहे,नागरिकांकडून आधीच कोरोना मुळे रुग्णालये पूर्णपणे भरली असताना जर साथीच्या रोगाचा फैलाव किंवा मच्छरांमुळे लहान मुले,महिला यांच्या आरोग्यावर परिणाम होऊन रोगप्रतिकारक क्षमता कमी झाल्यास कोरोना विषाणूची लागण सहज होण्याची शक्यता नाकारता येत नाही,त्यामुळे ह्याचा काहीतरी बंदोबस्त व्हावा ह्या दृष्टीने चर्चा शहराच्या नाक्यानाक्यावर व सोशल मीडिया च्या विविध ग्रुपवर पाहायला मिळते आहे.नेहमीच माणगावकरांच्या हाकेला धावून जाणारे व शहरातील समाजाच्या सर्व स्तरामध्ये कमालीचे लोकप्रिय असणारे युवानेते निलेश थोरे यांनी सर्वसामान्य जनतेची हीच अडचण लक्षात घेऊन,माणगाव शहरामध्ये माझे शहर...माझी जबाबदारी...ही मोहीम चालू करत असल्याचे पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.प्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले कि महाराष्ट्र शासनाने सुरु केलेला माझे कुटुंबं,माझी जबाबदारी हा उपक्रम स्तुत्य आहेच,प्रशासन देखील त्या उपक्रमाची अंमलबजावणी योग्य रित्या करीत असेलही,पण कुठेतरी केवळ आपल्या कुटुंबापुरता विचार न करता किंबहुना माझे शहर हेच माझे कुटुंबं आहे आणि त्या आस्थेने माझ्या,आपल्या शहराची काळजी घेणे हे आपले कर्तव्य असल्याचा विचार मनात आल्याने युवानेते निलेश थोरे मित्र मंडळाने माझे शहर...माझी जबाबदारी...हा उपक्रम हाती घेऊन संपूर्ण माणगाव शहराचे मोफत निर्जंतुकीकरण करण्याचे ठरविले आहे.  

      माणगाव शहरातील तुंबलेली गटारे,कचरापेट्या,रहिवासी संकुले,सोसायट्या,बाजारपेठ,घरे, दुकाने इ. ठिकाणी मोफत विषारी किटक,जीवजंतू  प्रतिबंधात्मक धूर फवारणी व बिल्डिंग,घरे, सोसायटी,ऑफिस,हॉटेल्स,लॉजिंग, व्यापारी दुकानामध्ये मोफत सॅनिटायझर स्प्रेईंग करून संपूर्ण निर्जन्तुकिकरण करून देणार आहोत. त्याकरिता लागणारे सर्व यंत्र व साहित्य,सॅनिटायझर ई. ची खरेदी आपण शहराप्रती असलेली बांधिलकी व शहरावर असलेल्या प्रेमापोटी स्वखर्चातून करणार असून युवानेते निलेश थोरे मित्रमंडळाच्या तज्ज्ञ व्यक्तींच्या देखरेखीखाली सदर मोहीम राबवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच ह्या मोहिमेमध्ये ज्यां नागरिकांना आपली सोसायटी,दुकाने,घरे,आजूबाजूचा परिसर ई.चे मोफत निर्जंतुकीकरण करायचे असेल त्यांनी दिनांक 14 ऑक्टोबर पर्यंत 7709650503/8260484848 ह्या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.दरम्यान माणगाव शहरात शहरावर निस्सीम प्रेम करणारा सर्वसामान्यांचा हक्काचा माणूस म्हणून जनतेकडून युवा नेते निलेश थोरे यांचे कौतुक होत आहे.शहराच्या भल्यासाठी पक्ष बाजूला ठेऊन कोणतेही पक्षीय राजकारण न करता सर्व नागरिकांना एकत्र आणण्याची कला अवगत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये दिसून येत आहे तसेच वारंवार होणाऱ्या डासांच्या प्रादुर्भावापासून सुटका होणार असल्याने तसेच सॅनिटायझर फवारणी मुळे सोसायटमध्ये याआधी आढळलेले कोरोना रुग्णाची घरे व परिसराचे निर्जंतुकीकरण होणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies