गांधील माशीच्या हल्ल्यात दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू साताऱ्यातील ढेबेवाडी येथील घटना - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 27, 2020

गांधील माशीच्या हल्ल्यात दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू साताऱ्यातील ढेबेवाडी येथील घटना

 गांधील माशीच्या हल्ल्यात दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू साताऱ्यातील ढेबेवाडी येथील घटना

प्रतिक मिसाळ -सातारा

गांधील माशांनी केलेल्या जोरदार हल्ल्यात घराच्या गच्चीवर खेळणाऱ्या दोन मुलींचा मृत्यू झाल्याची घटना महिंद ( ता . पाटण ) येथील बौद्धवस्तीत घडली आहे . अनुष्का दिनेश यादव ( वय १२ ) आणि शेजल अशोक यादव ( वय आठ ) अशी मुलींची नावे आहेत . या घटनेत आणखी पाचजण जखमी झाले आहेत . घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी ( ता .26 ) सायंकाळी पाचच्या सुमारास महिंद येथील बौद्धवस्तीतील तुकाराम ज्ञानू यादव यांच्या घराच्या गच्चीवर अनुष्का , शेजल व आणखी एक लहान मुलगा असे तिघेजण खेळण्यास गेलेले होते . त्यावेळी त्यांच्या घरापाठीमागे असलेल्या मोठ्या झाडाच्या फांद्यांवरून उड्या मारणाऱ्या वानरांच्या कळपाचा लगतच्याच पडक्या घराच्या छप्परास असलेल्या गांधील माशांच्या पोळ्याला धक्का लागला . त्यामुळे चवताळलेल्या माशांनी गच्चीवर खेळणाऱ्या मुलांवर जोरदार हल्ला चढवला . मुलांचा आरडाओरडा ऐकून मदतीसाठी गच्चीवर धावलेल्या यादव कुटुंबियातील काही जणांनाही माशांनी चावा घेत जखमी केले . त्यानंतर तातडीने अनुष्का , शेजल व अन्य जखमींना उपचारासाठी तळमावले येथील खासगी दवाखान्यात नेण्यात आले . त्यापैकी अनुष्काचा उपचारा दरम्यान काही वेळानी तर रात्री एकच्या सुमारास शेजलचाही मृत्यू झाला . अनुष्काचे मुळगाव येळगाव ( ता कराड ) असून काही दिवसांपूर्वीच ती आपल्या आजोळी महिंद येथे आली होती . या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .

No comments:

Post a Comment