Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

सरपंचांनी समन्वय साधून राज्यशासनाच्या व इतर योजना ग्रामस्तरावर तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करावे - शरद पवार

 सरपंचांनी समन्वय साधून राज्यशासनाच्या व इतर योजना ग्रामस्तरावर तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करावे - शरद पवार

कुलदीप मोहिते-कराड


महाराष्ट्र सरपंच परिषद पुणे यांचा लोगो अनावरणाचा  कार्यक्रम  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत बारामती येथे पार पडला- सरपंच परिषदेच्या निमित्ताने सरपंच मंडळींनी समन्वय साधून राज्यशासनाच्या तसेच इतर योजना ग्रामस्तरावर तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करावे आणि ग्रामस्तरावरील विविध समस्यांबद्दल शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी देखील सरपंच परिषदेने पुढाकार घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले.

सरपंच परिषदेची स्थापना एकत्रित पुढाकाराने केली गेली ही एक आनंदाची बाब असून कोरेगांव तालुक्यातील सरपंच जितेंद्र भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे या पुढाकाराबद्दल शरद पवार यांनी विशेष अभिनंदन केले.

सरपंच परिषदेत महिला टक्केवारी ५० टक्के रहावी अशी अपेक्षा शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली. सरपंच परिषदेच्या माध्यमातून राज्यात संघटनेचे विभागवार जाळं पसरावं, जेणेकरून अधिकाधिक संघटीत शक्ती ग्रामपंचायतींच्या उन्नतीसाठी एकत्रित येईल आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा त्यामुळे बदलताना दिसेल असा आशावाद शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान यावेळी जितेंद्र भोसले रणजीत पाटील शंकर खापे माऊली  वेल्लाळ व महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies