Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

सेवाव्रतीची सेवा ,प्रा. रविंद्र कोकरे यांचा लेख!!!

 आजपासून लेखक प्रा.रविंद्र कोकरे यांचं सदर चालू करत आहोत,रोज ते आपल्या भेटीला येतील "अध्यात्म"या सदरात अत्यंत वाचनीय असं हे सदर आपल्याला निश्चित आवडेल,आपल्याला हे सदर कसे वाटतं हे जरूर आम्हांला लेखाच्या खाली कमेंट करून कळवा.


सेवाव्रतीची सेवा

प्रा.रविंद्र कोकरेआदरणीय श्री. शिवशंकर पाटील, शेगांव.

वय वर्षे 77. चौथी वर्ग पास.

पण मॅनेजमेंट गुरू.

शेगाव संत गजानन महाराज मंदिर संस्थनचे सर्वेसर्वा, मेडिकल कॉलेज, 

शाळा, दवाखाने, बँक, आणखी बरंच काही.

बरं शहरात स्वतःच वीज केंद्र.

कदाचित MSEB चा वीजप्रवाह खंडित झाला,

तर मंदिरालाच नव्हे तर संपूर्ण शहराला

वीजपुरवठा करण्यात येतो...


ही व्यक्ती मंदिरात येण्यापूर्वी स्वतः चे जोडे 

हाताने झटकतात, पुन्हा बाहेर पडण्यापूर्वी हेच करतात, बाहेरची धूळ मंदिरात नको.


निस्वार्थी सेवा.

11 हजार सेवक एक रुपया न घेता काम करतात.

ही बाब विश्वास करण्यासारखी नाही,

पण हे सत्य आहे.


येथे चप्पल ठेवण्यासाठी स्टँड आहे.

सांगता येत नाही कधी तुमची चप्पल 

कोणी IAS उचलून तुम्हाला टोकन देईल.


मा. शरद पवार साहेबांनी सुद्धा इथे सेवेकरिता अर्ज केला होता, 

मात्र तरीही त्यांचा अर्ज 6 महिने वेटिंगला होता.

विचार करा,,, 

म्हणजे किती लोक निस्पृह सेवा देतात.


स्वच्छता इथली प्रथम प्राधान्य आहे.

कुठ नारळ, हार चालत नाही.

फुलांची पाकळी जरी मंदिरात सापडली तरी 

1 लाख रु. बक्षीस मंदिराने जाहीर केले आहे.


 सेवा म्हणजे सेवा 


महाराष्ट्र सरकारने 10 कोटी रु.

कोरोना सेन्टर देण्याचं ठरवल्यावर फक्त 

त्यातले 2 कोटी रु. खर्च करून 8 कोटी रु. परत देणारा माणूस म्हणजे 

भाऊ शिव शंकर पाटील...


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies