राज्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी -आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, October 9, 2020

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी -आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती


राज्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी -आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

महाराष्ट्र मिरर टीम-मुंबई राज्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असून बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यु रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असून टेलीआयसीयु प्रकल्प त्यासाठी उपयुक्त ठरत आहे. त्याच्या मदतीने कोरोनामुळे होणारा मृत्यूदर एक टक्क्यावर आणण्याचे उद्दिष्ट असून टेलिआयसीयूचा राज्यभरात विस्तार करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सकारात्मक आहेत.


राज्यात भिवंडी,औरंगाबाद, जालना,सोलापूर पाठोपाठ आज जळगाव आणि अकोला येथील रुग्णालयांमध्ये टेलिआयसीयुचा शुभारंभ करण्यात आला.


यावेळी अकोला जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता आदी उपस्थित होते.अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

No comments:

Post a Comment