स्मशानभूमीचा वाहून गेलेल्या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, आरपीआयचा आंदोलनाचा इशारा - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, October 23, 2020

स्मशानभूमीचा वाहून गेलेल्या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, आरपीआयचा आंदोलनाचा इशारा

 सावळजमध्ये रस्त्याअभावी मयताची  हेळसांड 


स्मशानभूमीचा वाहून गेलेल्या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, आरपीआयचा आंदोलनाचा इशारा

उमेश पाटील-सांगलीसावळज येथे अग्रणी नदीशेजारील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता पुराने वाहुन गेल्याने रस्त्याअभावी मयताची हेळसांड होवुन मोठी गैरसोय होत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आठ दिवसानंतर ही रस्ता न केल्याने सावळज आरपीआयच्यावतीने आंदोलनाचा इशारा आला आहे. 

 सावळज येथे जुना जोतिबा रोडनजीक अग्रणी नदीच्या पुलाजवळ सार्वजनिक स्मशानभूमी आहे. पण अग्रणी नदीला वारंवार पुर आल्याने गैरसोय होत होती.  पण  मागील ८ दिवसापूर्वी अतिवृष्टीमुळे नदीला आलेल्या पुरामुळे स्मशानभूमीकडे जाणार्या पुलाशेजारील रस्ताच खचून वाहुन गेल्याने मोठा खड्डा पडला आहे. तसेच पुलाची संरक्षक भिंत ही वाहुन गेली आहे. त्यामुळे गावात कोणतेही मयत झाल्यास अंत्यविधीसाठी सरण नेणे व प्रेत नेण्यासाठी मोठी अडचण होत आहे.  खाड्यात उतरून स्मशानभूमीकडे नेहताना मयताची हेळसांड होत आहे. त्यामुळे नागरिकांच्यातुन संताप व्यक्त केला जात आहे.  तरी प्रशासनानेे तातडीने लक्ष देऊन स्मशानभूमीचा रस्ता करावा व मयताची हेळसांड थांबवावी अशी मागणी होत आहे.

  या गैरसोयीबाबात संबंधित सर्व विभागांना स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता दुरूस्ती करणेविषयी लेखी कळविले आहे. परंतु प्रशासनाने पुर्णत: दुर्लक्ष करीत गांधारीची भुमिका घेतल्याने संताप व्यक्त केला जात आहे. तरी प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास तिव्र आंदोलन करण्याचा तासगाव तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अध्यक्ष प्रविण धेंडे यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment