शेताच्या बांधावर जाऊन राहिलेले पंचनामे करा,जिल्हाप्रमुखांचे शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांना आवाहन
उमेश पाटील -सांगली
शिवसेनेची सांगली येथे गेस्ट हाऊसमध्ये महत्वपूर्ण बैठक संजय बापु विभुते जिल्हाप्रमुख यांचे नेतृत्वखाली झाली पदाघिकारी व शिवसैनिक यांना चार्जिग करून कामाला लागण्यासाठी त्यांनी आवाहन केले. गगावागावात शाखा काढुन संघटनात्मक बांधणी मजबुत करण्याचे ठरले ..यावेळी बोलताना जिल्हा प्रमुख संजय विभूते म्हणाले की अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून काही ठिकाणचे पंचनामे राहिले आहेत का याची खातरजमा करावी आणखी प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम शिवसेनेच्या प्रत्येक शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी करावे तसेच शासनाने जाहीर केलेली मदत ही प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचते की नाही याचीही खात्री प्रत्येक शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी करून एकही शेतकरी मदतीविना वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन आजच्या बैठकीमध्ये करण्यात आले सर्व मरगळ झटकून प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी काम करावे जो करणार नाही त्याला घरचा रस्ता दाखवला जाईल अशा कडक शब्दात जिल्हाप्रमुख विभूते यांनी पदाधिकाऱ्यांना फटकारले आहे. यावेळी जिल्हा संघटक बजरंग पाटील ,महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सुवर्णाताई मोहिते ,सुजाता इंगळे ,शंभूराज काटकर, महादेव मगदूम ,महेंद्र चंडाळे ,मयूर घोडके, हरिभाऊ लेंगरे ,विशाल रजपुत ,सरोजनी माळी ,मंदा जगताप ,रुक्मिणी आंबेगेर ,सुगंधा माने ,रुपेश मोकाशी ,अमोल पाटील ,चंद्रकांत मयुरे ,नितीन काळे ,गजानन मोरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते
No comments:
Post a Comment