Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

पदार्थांतील भेसळ थांबवा,शिवसेना महिला आघाडीचे निवेदन


पदार्थांतील भेसळ थांबवा,शिवसेना महिला आघाडीचे निवेदन


उमेश पाटील -सांगलीमहिला आघाडी सांगली शहर प्रमुख मानसी जितेंद्र शहा यांचे नेतृत्वाखाली अन्न व औषध आयुक्त कार्यालय येथे बाजारपेठेतील बोगस हॅन्ड सानीटायझर विक्री करून काही दुकानदारांनी नागरिकांची फसवणूक करत आहेत तसेच येणाऱ्या दसरा-दिवाळी सणासुदीत बाजारामध्ये भेसळयुक्त तेल भेसळयुक्त दूध खवा रवा मिठाई बेकरी पदार्थ या पदार्थांमध्ये भेसळयुक्त आरोग्यास घातक कलर वापरला जातो तसेच सदरच्या पदार्थावर ती उत्पादन दिनांक व एक्सपायरी दिनांक छापलेली नसते नवीन शासन निर्णयानुसार अशा सर्व पदार्थ वरती उत्पादन दिनांक व एक्सपायरी दिनांक छापणे सक्तीचे आहे पण उत्पादना कडून असे कोणतेही   आदेशाचे पालन होत नाही त्या आदेशाचे पालन करावे व सर्व प्रकारच्या भेसळीवर अन्न औषध प्रशासनाने कठोर कारवाई करावी यासाठी निवेदन देण्यात आले.

यावेळी मानसी जितेंद्र शहा, विदुला शिंदे ,मुमताज मुजावर अंकिता करमरकर ,पुनम गायकवाड ,वैशाली वाघमारे , जितेंद्र शहा, प्रभाकर कुरळकर ,संदीप शिंत्रे, संदीप मंडले,आकाश पवार ,विजय पाटील इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies