शेतकऱ्याच्या दुर्दैवाचा फेरा चुकेनात,मळणीसाठी आणलेलं पीक दिलं अज्ञाताने पेटवून
महाराष्ट्र मिरर टीम-उस्मानाबाद.
उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील बोरी गावचे दगडू नाझीम शेख हे शेतकरी यांनी या कोरोनाच्या महामारीच्या काळात आलेल्या संकटांना तोंड देत आपला संसाराचा गाडा चालवत होते.आपल्याकडे असलेली तुटपुंज्या स्वरूपाची शेतीची कशीबशी मशागत करून असलेल्या दीड एकर जमिनीत सोयाबीन या पिकाची लागवड केली होती. कधी उन्हाचा तर कधी अवकाळी पावसाच्या तडाख्यात यांनी आपल्या सोयाबीन पिकाची काढणी केली पण दुर्दैवाने त्यांच्या काढलेल्या सोयाबीन पिकाला अज्ञाताकडून आग लावण्यात आली."हाताशी आलेलं पीक अन तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला" याच चिंतेने शेतकरी अजूनही व्याकुळ आहे. या घटनेचे पंचनामे झाले परंतु अद्याप याचा पाठपुरावा केला नाही .याचा काही तरी मोबदला मिळावा या आशेने शेतकरी व कुटुंब सैरवैर आणि हवालदील झाले आहेत.
या शेतकऱ्यावर कोसळलेल्या संकटांवर आता नेमका तो शासकीय मदतीसाठी शेतकरी डोळे लावून बसला आहे. पंचनामे झाले परंतु अद्याप शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नसल्याचे शेतकऱ्यांने सांगितले.