मुरबाड तालुका अनु.जमाती मोर्चा अध्यक्षपदी दत्तु वाघ यांची निवड - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 6, 2020

मुरबाड तालुका अनु.जमाती मोर्चा अध्यक्षपदी दत्तु वाघ यांची निवड

 मुरबाड तालुका अनु.जमाती मोर्चा अध्यक्षपदी दत्तु वाघ यांची निवड 


  सुधाकर वाघ-मुरबाड मुरबाड तालुक्यातील सामजिक क्षेत्राबरोबर राजकिय क्षेत्रात कार्य करणारे मुरबाड पंचायत समितीचे माजी सभापती दत्तु गणपत वाघ यांची भाजपा पक्षाच्या मुरबाड तालुका  अनु. जमाती मोर्चा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सन 2017 च्या पंचायत समिती निवडणूकीत सदस्य म्हणुन निवडुन आल्यानंतर  आमदार किसन कथोरे  व खासदार कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तु वाघ यांनी  मुरबाड पंचायत समितीचे सभापती पद भुषविले आहे.  लॉकडाऊनच्या काळात मुरबाड तालुक्यातील गोरगरीब आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यासाठी आमदार कथोरे यांनी तत्कालीन सभापती दत्तु वाघ व कार्यकर्त्यांना संपूर्ण तालुक्याची जबाबदारी दिली. दत्तु वाघ यांनी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन तालुक्यातील आदिवासी वाडी - वस्तीत  जाऊन प्रत्येक कुटूंबापर्यत अन्नधान्य पोहोचवीण्याचा प्रयत्न केला व गोरगरीब जनतेची सेवा केली होती.  खासदार कपिल पाटील व आमदार तथा ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष किसन कथोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या  भाजपा पक्षाच्या तालुका कार्यकारणीच्या निवडीत दत्तु वाघ यांची   मुरबाड तालुका अनुसुचित जमाती मोर्चा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.  त्यामुळे तालुक्यातुन त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

No comments:

Post a Comment