लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा 47 व्या गळीत हंगामाचा 6 तारखेला शुभारंभ
हेमंत पाटील-पाटण
कारखान्याच्या सन 2020-21 या गळीत हंगामासाठी नोंदविलेल्या संपुर्ण ऊसाचे गाळप पुर्ण करण्याच्या दृष्टीने तोडणी वाहतूक यंत्रणेची पुर्वतयारी झालेली आहे.कारखान्याची ओव्हर ऑइलिंगची कामे त्याचबरोबर मशिनरीमधील आवश्यक त्या दुरुस्तीची कामे पुर्ण झालेली आहेत. प्रारंभी कारखान्याचे व्हा.चेअरमन राजाराम पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी मंदाकिनी राजाराम पाटील यांच्या हस्ते विधीवत पुजा करण्यात येणार आहे. समारंभात गळीत हंगामाच्या नियोजनाबाबत गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई मार्गदर्शन करणार आहेत. कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व दक्षता घेवून तसेच सामाजिक अंतराचे पालन करुन गळीत हंगामाचा शुभारंभ होणार आहे अशीही माहिती चेअरमन पाटील यांनी दिली आहे.