Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

अर्णव अटकनाट्य ... गदारोळ!

 अर्णव अटकनाट्य ... गदारोळ!

सुशांत सिंगला न्याय हवा मग अन्वय नाईकना का नको?

आजही अटक प्रकरणानंतर जनतेला चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली जातेय! आर्णब चे रिपब्लिकनचे माध्यमातून!

अनेक अंधानुकरण कर्ते ओरडत आहेत, निषेध करत आहेत.

विडियो पसरवत आहेत.

आपल्याला माहिती मिळाली तर पडताळणीची पत्रकार म्हणून  जबाबदारी असते ती पुर्ण करायला हवी!

मुंबई पोलीस बदनामी सुशांतसिह,टिआरपी या विषयाशी व पत्रकारितेचा या अटकेचा काहीच संबंध नाही.

अन्वय नाईक प्रकरण तेव्हा दडपल ते आताही तसच रहायला हवं होत का? हा प्रश्न कुणीच का विचारत नाहीत?

पत्रकार म्हणून नव्हे तर मालक म्हणून गोस्वामीनी काम करुनही अन्वय नाईक यांना पैसे न दिल्याने दोघांचे जीव गेले.

मरणाआधी  नाईक यांनी  आपल्या आत्महत्येचे कारण लिहून ठेवलेय!

सुशातसिंह बिहारका बेटा म्हणून त्याच्या मृत्यूनंतर आकांडतांडव आणि अन्वय नाईक हे माणूस नव्हते का,महाराष्ट्राचे देशाचे सुपुत्र होते न, मग त्यांना  न्याय मिळायला नको का?

आजही आर्णब अटकप्रकरणी खोटा प्रचार होतोय,विषय काय आणि चाललय काय?

चँनलवर *तुम मेरा कुछ नही बिघाड सकते* म्हणणाऱ्याने आज छातीठोकपणे चौकशीला सामोरं जायला हवं होतं!

कशासाठी मारले म्हणून ओरड,पुलिस घसिटकर लेके गई म्हणून उर बडवणं?

काही जण तर थेट मुंबई पोलिसांनी अटक केली म्हणत आहेत.

धन्य आहे अशा अंध,मंद लोकांची व पत्रकारितेची!

सोशल मीडियावर गदारोळ हा पेड असतो हे सगळ्यांना माहिती,पण पत्रकारही बातमीवर खोटे आवरण चढवू लागले तर ते। नीतीमूल्यांना धरुन नाही.

कुठे चाललीय लोकशाही आणि पत्रकारिता?

-

शीतल करदेकर

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies