कोंगनोळीत 7 एकर ऊसाचा फड जळून खाक 13 लाखाचे नुकसान
उमेश पाटील -सांगली
कोंगनोळी तालुका कवठेमहांकाळ येथील विजय आण्णासाहेब शिकारखाने व मुकुंद आण्णासाहेब शिकारखाने या शेतकऱ्यांचा जवळ जवळ असणारा 7 एकर ऊसाचा फड इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट ने जळून खाक झाला यात दोन्ही शेतकऱ्यांचे मिळून 13 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी, ऊसाच्या शेती वरून इलेक्ट्रिक बोर्डाची लाईन गेली आहे उसाच्या शेती शेजारी जनावरे राखणाऱ्या गुराख्यास उसाच्या फडात लाईन स्पार्क होऊन ठिणग्या पडताना दिसल्या जवळ जाऊन नेमके कसल्या ठिणग्या पडत आहेत हे पहिले तोपर्यंत ऊसाच्या वाळलेल्या पाल्याला मोठी आग लागली गुराख्याने ऊस फडाच्या मालकांना फोन वरून माहिती सांगीतली लगेच दोन्ही शेतकरी काही तरुणांना घेऊन ऊसाच्या फडाजवळ पोहचले व आग विझविण्याचा पर्यंत करू लागले पण वारे असल्यामुळे क्षणातच आगीचा वणवा पेटला आगीने रौद्र रूप धारण केले त्यामुळे आग विझविण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला , दोन्ही फडात ठिबक सिंचन केले होते ते ठिबक सिंचनाच्या पाईपा व मोठी पाईप लाईन असे सर्व जळून खाक झाले.
गावालगतच शेती असल्याने जळालेला ऊसाचा फड पाहण्यास घटनास्थळी ग्रामस्थानी गर्दी केली होती, घटना समजल्यानंतर कोंगनोळी चे सरपंच , उपसरपंच सदस्य, संस्थांचे पदाधिकारी यांनी विज बोर्डाचे अधिकारी मलमे मॅडम व गावकामगार तलाठी यांच्यासोबत घटनास्थळाची पाहणी केली यावेळी गावकामगार तलाठी शिवाजी नरुटे यांनी जळालेल्या ऊसाचा पंचनामा केला यात गट नं 641/1 मधील शेतकरी विजय आण्णासाहेब शिकारखाने यांचे साडेतीन एकर व मुकुंद आण्णासाहेब शिकारखाने यांचे साडेतीन एकर असे दोन्ही मिळून 7 एकर क्षेत्रातील ऊसाचा फड व त्यातील ठिबक सिंचन सट संपूर्ण जळाला, ऊसाचे दहा लाख पन्नास हजार रुपयांचे नुकसान व ठिबक सिंचन चे 3 लाख 4 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
पूर्ण साखर भरलेला व कारखान्याला ऊस घालवायला आलेला लाखो रुपये गुंतवून उभा केलेला ऊसाचे पीक जळून गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे, ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर 7 एकर ऊसाचा फड जळून खाक झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे , लवकरात लवकर शासनाकडून शेतकऱ्यास नुकसानभरपाई मिळावी अशी अपेक्षा परिसरातील शेतकरी करत आहेत.