माथेरान न.पा.तील विकास कामाचे लोकार्पण ,भूमिपूजन
कॉन्व्हेंट शाळेच्या नवीन रस्त्यांमुळे पालक विद्यार्थी खुश
चंद्रकांत सुतार-- माथेरान
माथेरान नगरपरिषदेच्यावतीने आज माथेरान मध्ये विविध विकास कामांचे उदघाटन व भूमिपूजन झाले, आजच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून माथेरान नगरपालिकेच्या लोगो चे अनावरण ही करण्यात आले एकूण दोन कामांचे भूमिपूजन तर चार कामांचे उदघाटन झाले,
पंचवटी नगर येथील गार्डन विकसित स्वच्छ स्वरक्षण अंतर्गत हे गार्डन चे काम होत आहे अंदाचे 594948 रुपये खर्च करून हे काम होणार आहे, वीर हुतात्माभाई कोतवाल प्राथमिक शाळेतील कंपाउंड वॉल, नगरपरिषद फंडातून 3586426 रुपये खर्च करून तर नगरपरिषद कार्यालय येथील कंपाउंड वॉल नगरपालिका फंडातून 4397715 रुपये खर्च करून ह्या वॉल बांधण्यात आल्या.नगरपालिका कार्यालय समोरील कमानी साठी नगरपरिषद फंडातून 576232 रुपये खर्च करण्यात आला* पांडे रोड येथील कमान नगरपालिका फंडातून 1274333 रुपये खर्च करून पूर्ण करण्यात आली
कॉन्व्हेंट शाळेत जाणार रस्ताविशेष पर्यटन अनुदानातू 3471181 रुपये खर्च करून जांभ्या दगडात पूर्ण करण्यात आला, या मुळे शाळेतील सर्वच पालक ,शिक्षक समाधानी आहेत,
सध्या mmrda मार्फत माथेरान च्या 3 पॉईंट चे सुशोभीकरण चे काम चालू आहे, माथेरान च्या एकूण 38 पॉईंट पैकी अनेक पॉईंट चे अंतर्गत रस्ते खूपच खराब झाले आहेत, त्यातील खंडाळा पॉईंट कडे जाणार रस्त्याची अवस्था ही बिकट आहेच हा रस्ता विकसित करणे कामाचे 7382815 रुपये खर्च करून विशेष रस्ता अनुदानातून हा रस्ता पूर्ण करण्यात येणार आहे, आजच्या उदघाटन , भूमी पूजनचे उदघाटन आमदार महेंद्र थोरवे, नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांच्या हस्ते करण्यात आले,
कोरोनाच्या परिस्थितीत शासनाचे सर्व नियमांचे पालन करत आजचा उदघाटन समारंभ करण्यात आला, सोशल डिस्टन्स ठेऊन तोंडाला मास्क लावून हा कार्यक्रम पार पाडला यावेळी , मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, गटनेते, बांधकाम सभापती प्रसाद सावंत, शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी, नगरसेवक नगरसेविका माथेरान पोलीस स्टेशनचे सहाय्यक प्रशांत काळे ,नगर अभियंता चेतन तेलंगे, नगरपालिका कर्मचारी वर्ग स्थानिक नागरिक उपस्थित होते.
माथेरानचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे, बेरोजगारी ,वाढीव लाईट बिलचा प्रश्न आहे . मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा करून शासनाच्या माध्यमातून जेवढे सहकार्य माथेरान जनतेला करता येईल तेवढे आम्ही भविष्यात करणार आहोत
महेंद्र थोरवे -आमदार कर्जत खालापूर
माथेरान हे पर्यटन स्थळ हे जागतिक दर्जाचे होण्यासाठी अनेक कामे प्रस्तवित आहेत, ती प्रगती पथावर आहेत ती पूर्ण करण्याचा प्रयन्त सुरू आहे,
प्रेरणा प्रसाद सावंत, नगराध्यक्ष
माथेरान न. प.