श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटनाला सुरुवात समुद्रकिनारी पर्यटकांची तुरळक गर्दी - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, November 2, 2020

श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटनाला सुरुवात समुद्रकिनारी पर्यटकांची तुरळक गर्दी

 श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटनाला सुरुवात

समुद्रकिनारी पर्यटकांची तुरळक गर्दी 

अमोल चांदोरकर - श्रीवर्धन


टाळेबंदीत शासनाने हळूहळू शिथीलता आणली असल्याने आता सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. अनलाॕक 5 मध्ये ठप्प झालेल्या पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी काही अटी व नियमांचे काटेकोर पालन करुन बंदी उठवल्याने श्रीवर्धन मधील दिवेआगर ,श्रीवर्धन, हरिहरेश्वर, शेखाडी अशा विविध किनाऱ्यावर पर्यंटकांची रेलचेल पाहायला मिळत आहे.यामुळे स्थानिक व्यावसायिकांना दिलासा मिळत आहे.

मार्च महिन्यांपासून देशासह राज्यात कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर शासनाने लॉकडाऊन जाहीर केले होते.धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे ,समुद्रकिनारे हे देखील पर्यटकांसाठी बंद करण्यात आले होते. सर्व व्यवहार देखील ठप्प झाले होते.याचा मोठा फटका खानावळ व्यावसायिक,हॉटेल व्यावसायिक,कॉटेज,रूम व्यावसायिक यांच्यासह पर्यटन व्यवसायावर अवलंबुन असणाऱ्या इतर व्यावसायिकांना देखील बसला होता.

मात्र आठवड्याभरापासून श्रीवर्धन तालुक्यातील प्रमुख पर्यटन स्थळे असणाऱ्या दिवेआगर,श्रीवर्धन, हरिहरेश्वर,शेखाडी,आदगाव,वेळास आगर या ठिकाणी पुन्हा पर्यटकांची रेलचेल काही प्रमाणात दिसून येत आहे.गेले आठ महीने लॉकडाउनमुळे ठप्प झालेल्या पर्यटन व्यवसायाला या पर्यटकांमुळे उभारी घेण्यास मदत होणार आहे.त्यामुळे श्रीवर्धन तालुका पर्यटकांच्या स्वागतासाठी पुन्हा सज्ज झाला आहे परंतु व्यवसाय सुरु करताना शासनाने दिलेल्या नियमांच्या चौकटीत राहुनच व योग्य ती काळजी घेणे याचेसुध्दा भान व्यावसायिक व पर्यटकांनी ठेवले तरच आपण पर्यटनाचा निखळ आनंद घेऊ.

पर्यटन सुरू झाल्याने सर्व व्यवसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत मात्र कोरोना अजून संपलेला नसून सर्व शासनाचे नियम व अटी पाळून ,गर्दी टाळून व्यवसाय करावा.

जितेंद्र सातनाक,नगराध्यक्ष ,श्रीवर्धन नगरपरिषद 

No comments:

Post a Comment