Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

भाजपाचे चून-भाकर आंदोलन

 कर्जत भाजपाचे चून-भाकर आंदोलन 

ज्ञानेश्वर बागडे-
महाराष्ट्र मिरर टीम


महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टी पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे.कोणत्याही शेतकऱ्यांपर्यंत शासनाची मदत पोहोचली नाही विदर्भ व मराठवाड्यातील लाखो शेतकऱ्यांची नावे  या मदतीमध्ये आलेली नाहीत. मुख्यमंत्र्यांनी संवाद कार्यक्रमात फराळ करा,रोषणाई करा असे वारंवार म्हटले परंतु शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच आहे.ना गोड-धोड ना रोषणाई शेतकऱ्यांसाठी ही दिवाळी,काळी दिवाळी आहे.असे कर्जत भाजपने दिलेेे
ल्या निवेदनात म्हटलं आहे.

तहसील कार्यालयात भाजप आणि किसान मोर्चा  यांचे वतीने चुन भाकर आंदोलन करण्यात आले. यावेळी सर्व शेतकरी आणि कार्यकर्ते यांनी चटणी भाकरी खाऊन तहसीलदार यांना चटणी भाकरी दिली. तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले। या निद्रिस्त सरकारला जाग आणण्यासाठी सरकारचा निषेध करत धरणे धरले.

यावेळी कर्जत तालुक्याचे अध्यक्ष मंगेश म्हसकर, कोकण संपर्क प्रमुख सुनिल गोगटे, उत्तर रायगड किसान मोर्च्याचे अध्यक्ष परशुराम म्हसे ,तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील, नगरसेवक बळवंत घुमरे ,नगरसेविका विशाखा जिनगरे ,तालुका महिला अध्यक्ष स्नेहा गोगटे ,गायत्री परांजपे ,संदीप म्हसकर, उत्तम तिखंडे, अंकुश मुने ,केशव तरे ,प्रकाश पालकर ,अनिल पाटील ,मंगेश फुलावरे ,धोंडूराज बिवलकर ,पराग गायकवाड ,विजय जिनगरे ,वसंत महाडिक ,प्रवीण दळवी ,मयूर पाटील ,सर्वेश गोगटे ,नथु कराळे अणि बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies