माणगाव येथील जलसंपदा खात्याच्या भवनात उदघाटन अगोदरच कार्यालयीन कामकाज सुरू - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, November 13, 2020

माणगाव येथील जलसंपदा खात्याच्या भवनात उदघाटन अगोदरच कार्यालयीन कामकाज सुरू

 माणगाव येथील जलसंपदा खात्याच्या भवनात उदघाटन अगोदरच कार्यालयीन कामकाज सुरू

 संतोष सुतार-माणगाव


 नागरिकांना आपली जलसंपदा विभागाशी असणारी विविध प्रकारची कामे एकाच छताखाली करता यावीत तसेच त्यांचा वेळ व पैसा वाचवा या उद्देशाने माणगावात सन २०१४ मध्ये त्यावेळचे ना. सुनील तटकरे जलसंपदा तथा पालकमंत्री असताना शासनांकडे पाठपुरावा करून शासनाच्या ४७०१ हेटवणे मध्यम व मोठे पाटबंधारे प्रकल्प यांचे निधीतून सुमारे दोन कोटी नऊ लाख रुपये खर्चाचे जलसंपदा भवन मंजूर करून घेतले त्या जलसंपदा भवनाच्या भव्य इमारतीचे काम पूर्ण झाले असून हि इमारत प्रशस्त जागेत सर्व सोयींनीयुक्त उभी असून या इमारतीचे काम पूर्ण होऊन तब्बल दोन वर्ष लोटली असून या इमारतीचे अद्यापही उदघाटन झालेच नाही. मात्र शासनाच्या उदघाटन अगोदरच जलसंपदा विभागाच्या पाच हि विभागांनी आपला या इमारतीत कारभार सुरु केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये जलसंपदा भवनाचे उदघाटन कधी हा  एक चर्चेचा विषय बनला आहे. या जलसंपदा भवनाच्या उदघाटनाला शासनाचा मुहूर्त मिळता मिळेना झाला असून याबाबत नागरीकातून आश्चर्य व्यक्त होत आहे.   

      माणगाव येथे माजी जलसंपदा तथा पालकमंत्री सुनील तटकरे यांनी माणगाव तालुक्यातील नागरिक तसेच शेतकऱ्यांचा जलसंपदा विभागासी असणारी कामे वेळेत पूर्ण करता यावीत तसेच त्यांचा वेळ व पैसा वाचवा हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन तसेच नागरिक, शेतकऱ्यांच्या मागणीचा प्राधान्याने विचार करून माणगाव प्रशासकीय भवना जवळच जलसंपदा विभागाच्या जागेवर सर्व सोयींनीयुक्त जलसंपदा भावनाची भव्य इमारत उभारली रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड अंतर्गत जलसंपदा विभागाच्या उपविभागीय कार्यालयासाठी माणगाव येथे जलसंपदा भवन बांधणे साठी १३ फेब्रुवारी २०१४ रोजी माजी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते पार पडला होता. ती इमारत बांधून पूर्ण झाली असून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.  

     या जलसंपदा भवनाच्या इमारतीत मृद व जलसंधारण विभागाचे उपविभागीय जलसंधारण कार्यालय, जलसंपदा विभाग उप विभागीय अभियंता गुण नियंत्रण उपविभाग माणगाव, जलसंपदा विभाग उप विभागीय अधिकारी खारभूमी विकास उपविभाग माणगाव, जलसंपदा विभाग उप विभागीय अधिकारी लघु पाटबंधारे उपविभाग माणगाव, जलसंपदा विभाग सहाय्यक कार्यकारी अभियंता, पाटबंधारे उपविभाग माणगाव, असी पाच विभागीय कार्यालयांचा समावेश आहे.  या  जलसंपदा भवनात पाच कार्यालये एकाच छ्ताखाली असल्यामुळे नागरिक व   शेतकऱ्यांचा पैसा तसेच    वेळ वाचू लागला आहे.


No comments:

Post a Comment