कडाव - अंजप रस्त्याची दुरावस्था; ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सुर - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Tuesday, November 24, 2020

कडाव - अंजप रस्त्याची दुरावस्था; ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सुर

 कडाव - अंजप रस्त्याची दुरावस्था; ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सुर

नदीवरील पूल संरक्षक कठड्याविना.

नरेश कोळंबे-कर्जत

   कर्जत तालुक्यातील अंजप हे गाव अनेक वर्ष सुख सुविधांपासून वंचित आहे. अनेक रुग्ण , गरोदर महिला यांना उपचारासाठी दाखल करणे , हा रस्ता न झाल्याने  शक्य होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.

    कर्जत तालुक्यातील कळंबोली ते अंजप या आसपास दोन किलोमीटरच्या रस्त्याचे काम मागील काही वर्षात झाले नाही. गणेगाव ते कळंबोली या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले असून फक्त 2 किलोमीटर असलेल्या अंजप रस्त्याचे काम न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. हा रस्ता खडी व मोठे दगड यांनी भरलेला असल्याकारणाने रस्त्यावरून चालणे व वाहन चालविणे जिकिरीचे झाले आहे .

    कर्जत कडे येण्यासाठी गावातील लोकांना या तुटलेल्या रस्त्याचा वापर करावा लागतो. तसेच आजारी रुग्ण व गरोदर महिला यांना उपचारासाठी कडाव अथवा कर्जत येथे जावे लागते . रस्ता खराब असल्याकारणाने कोणत्याही प्रकारची रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचत नाही  .  अनेक वर्षे उलटूनही रस्ता न झाल्याने ग्रामस्थांनी आता आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवायला सुरुवात केली आहे. तसेच पेज नदीवरील ह्या रस्त्यातील  पूल अनेक वर्षे जुना असल्याकारणाने या पुलाच्या काही भागाला मोठे खड्डे पडले आहेत. तसेच या पुलाला कोणत्याही प्रकारचा कठडा नसल्याने व हा पूल तीव्र उतारावर असल्याने अपघात झाल्यास वाहक व प्रवासी यांना गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागेल. उतारावर गाडी न थांबल्यास ती गाडी थेट पेज नदीमध्ये जाण्याची तीव्र शक्यता आहे.  तसेच अंजप कळंबोळी हा रस्ता तसेच नदीवरील पूल तातडीने करण्यात यावा. येणाऱ्या निवडणुकीत आमचा रस्ता पूर्ण झाल्याशिवाय कुठल्याही नेत्याला आम्ही पाय ठेवू देणार नाही, असा सज्जड इशारा गावातील तरुण तानाजी मिणमिने यांनी दिला  आहे .

No comments:

Post a Comment