दुकानदार ,पत्रकार मारहाण प्रकरणी पोलीस शाम जाधव अखेर निलंबित
नागरिकांमधून समाधान व्यक्त
चंद्रकांत सुतार- माथेरान
शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास शिल्लक खाण्याच्या पानावरुन दुकानदार बिलाल महापुळे यास पोलीस शिपाई श्याम जाधव यांनी शिवीगाळ, व काठीने मारहाण केली, ह्या घटनेचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेले पत्रकार दिनेश सुतार यांनाही धक्का बुक्की करण्यात आली होती,या घटनेचे तीव्र पडसाद माथेरान सहित पूर्ण रायगड जिल्ह्यात उमटले होते, माथेरान करांनाबरोबर अनेक राजकीय मंडळींनी याबाबत संबंधित पोलीस शिपाई यांस निलंबित करावे यासाठी अग्रेसर होते. श्याम जाधव ह्या पोलीस शिपाईचे येथील पोलीस स्टेशनमध्ये ही वर्तणूक ठीक नव्हतीच,आजच्या निलंबनाची बातमी कानावर आल्याने अनेकानी तोंडातून वाईट बोलतच बरे झाले समाधान व्यक्त केले आहे, आजच्या पोलीस श्याम जाधव याचे निलंबन झाल्याने आपल्या अधिकाराचा गैरवापर करणाऱ्यांवर चाप बसला आहे,
माथेरान पोलीस ठाण्याचे पोलिस नाईक प्रशांत जाधव यांना रायगङ पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांनी पुढील आदेश मिळे पर्यन्त निलंबनाची कारवाई केली आहे त्यामुळे पोलीस व नागरिक यांचा असलेला जिव्हाळ्याचा नाते आणखीन दृढ होणार यात शंका नाही.
मला झालेल्या विनाकारण मारहाणीबाबत आज पोलीस श्याम जाधव निलंबित झाले हे समजले,हे पोलीस निलंबित झाले म्हणून आनंद वाटत नाही तर त्याची प्रवृत्तीमुळे एक पोलीस निलंबित होतो याचे वाईट वाटते, आम्ही नेहमीच पोलिसाना सहकार्य केले करत राहू, आज गुंडगिरी प्रवृत्ती निलंबित झाली एवढेच मी बोलेन बाकी मला ह्या बाबत ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्याचे मनापासून धन्यवाद.
बिलाल महापुळे- पान दुकानदार
बिलाल महापुळे- पान दुकानदार