शाळा बंद असली तरी शिक्षण मिळेल घरोघरी' ने वाचू लागली पहिलीची मुले
मिलिंदा पवार खटाव (सातारा)
दहिवडी-कोरोना या महामारी मुळे सध्या सर्व शाळा बंद आहेत . त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले . यावर उपाय म्हणून शासनाने ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचे ठरवले . त्यानुसार अनेक शिक्षकांनी सुरुवातही केली . परंतु लहान वयातील इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना मात्र ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादा येत होत्या विशेष करून पहिली चा नवख्या विद्याथ्यांची फारच अडचण येत होती . यावर उपाय म्हणून जि.प. प्राथ.शाळा वडगांव येथील उपक्रमशील शिक्षक श्री.संजय खरात यांनी एक आगळावेगळा उपक्रम शाळा बंद असली तरी शिक्षण मिळेल घरोघरी या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी शिक्षणाची गंगा पोहोचवली. यात प्रत्येक विद्यार्थी केंद्रभूत मानून स्वतः तयार केलेल्या वेगवेगळ्या शैक्षणिक साहित्यासह इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांच्या घरी जवळपास 1200 भेटी दिल्या . त्यासाठी त्यांनी विद्यार्थीनिहाय व घटकनिहाय स्वतः नियोजन करून प्रत्येक घटकासाठी शैक्षणिक साहित्य निर्मिती केली. प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र शैक्षणिक साहित्य संच दिला. विविध शैक्षणिक शैक्षणिक साहित्याद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गृहभेटीद्वारे पालकांच्या सहकार्यातून कृतीयुक्त शिक्षणाचा सराव दिला. त्यामुळे अक्षर ओळख ते उतारा वाचन पर्यंतचे सर्व टप्पे विद्यार्थ्यांनी पार केले आहेत.कोरोना काळात पाहिलीतली मुले कशी शिकणार हा प्रश्न भेडसावल्याने हा उपक्रम राबविला असल्याचे खरात गुरुजी यांनी सांगितले. जून2020 महिल्यापासून राबविलेल्या या उपक्रमामुळे पहिलीतील नवखी व प्रथमच शाळेत दाखन झालेली मुले अक्षर वाचन, शब्दवाचन,वाक्य तसेच उतारा वाचन , गणितील संख्या ओळख , गणिती क्रिया याबरोबरच भाषिक व गणिती खेळातही पारंगत झाले. आहेत . खरात गुरुजींच्या या उपक्रमाबद्दल पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे .
आपल्या या उपक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी सोनाली विभुते केंद्रप्रमुख नारायण आवळे शाळा व्यवस्थापन समिती सहकारी शिक्षक मोटे व राऊत तसेच पालकांचे मुलाचे सहकार्य मिळाल्याचे खरात यांनी आवर्जून सांगितले .
गटशिक्षणाधिकारी सोनाली विभुते यांनी घरी येवून माझ्या मुलीच्या अभ्यासातील प्रगती पाहून शाबासकी दिली. मुलीशी गप्पागोष्टी करून तिला मार्गदर्शन केले. निलम ओंबासे
खरात सर आम्हाला घरी येवून शिकवतात त्यांनी आम्हाला लिहायला वाचायला साहित्य दिले आहे. आम्ही चांगला अभ्यास केल्यावर सर आम्हाला शाबासकी देतात. बक्षीस देतात. त्यामुळे आम्हाला वाचन करायला आवडू लागले आहे................. रिद्धी व सिद्धी नागरगोजे.... इयत्ता पहिली
कोरोना काळात शाळा बंद असताना शाळेचे मुख्याध्यापक खरात सर यांनी घरी येवून मुलांना साहित्याचा वापर करून त्यांचा अभ्यास घेतला. त्यामुळे सुरुवातीला मुळाक्षरेही न येणारी माझी मुलगी गोष्टीची पुस्तकेही वाचू लागली आहे. माझी मुलगी संख्या वाचते व बेरीज वजाबाकीही करते. अविनाश नागरगोजे..... पालक