Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

सांगलीत सुंदरनगरमधील वारांगनानी स्वच्छ केला 1 किलोमीटरचा रस्ता

सांगलीत सुंदरनगरमधील वारांगनानी स्वच्छ केला 1 किलोमीटरचा रस्ता  

एक टन कचराही केला गोळा: समाजाचा दुर्लक्षित घटक उतरला शहर स्वच्छतेसाठी 

उमेश पाटील -सांगली


 सांगली महापालिकेच्या स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 साठी लोकसहभाग दर्शविण्यासाठी सांगलीच्या सुंदरनगर वेश्यावस्तीतील महिलांनी आज आपल्या वस्तीसह आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता करीत समाजाला स्वच्छतेचा संदेश दिला. एकाचवेळी 200 हुन अधिक वारांगना स्वच्छतेसाठी रस्त्यावर उतरल्याने सर्वांनीच या महिलांचे कौतुक केले. 

सांगलीच्या सुंदर नगर वेश्या वस्तीच्या प्रनेत्या स्व. अमिराबी शेख यांच्या प्रेरणेने या वस्तीचे आदर्शवत काम सुरू आहे. स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 साठी या महिलांनी सलग 3 वर्षे आपले योगदान देत आल्या आहेत. आज या वारांगना महिलांनी हात खोरे पाट्या घेत आपल्या वस्तीसह आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला. यामध्ये दसरा चौकातून आपटा पोलिस चौकी आणि महापालिकेचे आरसीएच सेंटरचा भागही स्वच्छ करीत परिसर चकाचक केला. एरव्ही आपल्या दारापुरती स्वच्छता करणाऱ्या या महिलांनी आज समाजासाठी स्वच्छता करत स्वच्छतेचा संदेश दिला. जवळजवळ 1 किलोमीटरचा परिसर या महिलांनी स्वच्छ करत स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 साठी आपल्या सांगली महापालिकेसाठी आपले  योगदान दिले. या उपक्रमाचे मनपा आयुक्त नितीन कापडणीस आणि उपायुक्त राहुल रोकडे , स्थानिक नगरसेवक प्रकाश मुळके, सामाजिक कार्यकर्ते जमीर कुरणे, अमर निंबाळकर, यांनी कौतुक केले. तसेच उपायुक्त स्मृती पाटील यांनीही या महिलासमवेत स्वच्छता मोहिमेत सहभागी होत स्वच्छता केली. या स्वच्छता मोहिमेत महिलांनी मार्गदर्शक पत्रकार दीपक चव्हाण यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने सहभाग घेत स्वच्छता केली. या मोहिमेत वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर यांच्यासह सुंदरनगर संस्थेच्या शोभा केंगार, सैफिन शेख, जानका चनाळ, गोदा भुसानी, गंगवा परलंकी, राधा हातलगे, सुमन वाघमारे, मल्यावा हिरामनी, यमनवा केंचकणावर यांच्यासह  स्वच्छता कर्मचारी सहभागी झाले होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies