चंदनाच्या झाडांची चोरी करून विकणाऱ्या टोळीला शाहूपुरी पोलिसांकडून अटक - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, November 1, 2020

चंदनाच्या झाडांची चोरी करून विकणाऱ्या टोळीला शाहूपुरी पोलिसांकडून अटक

 चंदनाच्या झाडांची चोरी करून विकणाऱ्या टोळीला शाहूपुरी पोलिसांकडून अटक

सुमारे 33000 रुपये किमतीचे चंदन जप्त

प्रतिक मिसाळ- सातारा 


सातारा सहा. पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी व सहा. पोलीस निरीक्षक विशाल वायकर ,संदिप शितोलेे व गुन्हेप्रकटी करण शाखेच्या स्टाफला सातारा शहरामध्ये चंदनचोरीचे गुन्हे वाढत असल्याने सदर गुन्हे उघडकीस आणने बाबत सूचना देवून मार्गदर्शन केले होते दि . 31/10/2020 रोजी  सहा . पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांना गोपनीय माहिती मिळाली की दोन इसम चंदनाची लाकडे घेवून ती विक्री करणेसाठी काशी विश्वेश्वर चौकात येणार आहेत म्हणून त्यांनी सदर इसमांना ताब्यात घेवून पुढील कारवाई करणे बाबत गुन्हेप्रकटीकरण शाखेस सुचनादिल्या त्याप्रमाणे शाहूपुरी गुन्हेप्रकटीकरण शाखेने सदर परिसरात सापळ लावता असता 17.30 वा . चे सुमारास दोन संशयीत इसम पोत्यामध्ये लाकडे घेवून जात असताना दिसली सदर इसमांचा संशय आल्याने गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या स्टाफने सदर इसमांना शिताफीने ताब्यात घेतले त्यांचेकडे सुमारे साठ किलो चंदनाची लाकडे गाभ्यासहित मिळून आलेने त्याबाबत त्यांचे कडे चौकशी करता सदर बाबत त्यांना काही एक स्पष्टीकरण देता येत नसल्याने व सदरची लाकडे चोरीची असल्याची संशय आल्याने सदरच्या दोन्ही इसमांना ताब्यात घेवून त्यांचेकडून सदरचा 33000 रु चा चंदनाचे लाकडांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .सदर संशयीत इसमांकडे चौकशी चालु असून त्यांचे कडून चंदनचोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे सदरची कारवाई  सहा पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांचे मार्गदर्शनाखाली सहा . पोलीस निरीक्षक संदिप शितोळे, पो हेड को हसन तडवी , पोलीस नाईक लैलेश अशोक फडतरे, अमित माने ,स्वप्निल कुंभार ,पो कॉ ओंकार यादव ,मोहन पवार ,पंकज मोहिते यांनी केली.

No comments:

Post a Comment